लठ्ठपणामुळे येणाऱ्या ‘व्याधी’

लठ्ठपणामुळे येणाऱ्या ‘व्याधी’

लठ्ठपणामुळे येणाऱ्या 'व्याधी'

धावपळीच्या आयुष्यात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तसेच काळजी घ्यायला पुरेसा वेळ कोणाकडेही नसतो. हल्ली सगळ्यांच्या कामाची पद्धत ही बैठ्या स्वरूपाची असल्याने लठ्ठपणाची समस्या अधिकांना बळावत असते. मात्र, या लठ्ठपणावर वेळीच उपाय न केल्यास अनेक व्याधी होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया लठ्ठपणामुळे कोणत्या व्याधी होण्याची शक्यता असते.

सांध्यांची झीज होणे

वजन वाढल्यामुळे गुडघ्यांवर जोर येतो. यामुळे सांध्यांची झीज होऊन त्रास होऊ शकतो. तसेच अतिवजनामुळे गुडघेदुखी, पाठीच्या मणक्यावर येणारा त्रास, पायावर सूज येणे, पायावरच्या शिरा फुगणे आणि त्या हिरव्या – निळ्या होणे, असे एक ना अनेक व्याधी होऊ शकतात.

लघवीचा कंट्रोल सुटणे

अनेकांच्या वाढत्या वजनामुळे पोटाचा घेर देखील वाढतो. या वाढत्या पोटामुळे लघवीचा कंट्रोल निघून जाणे, मळमळ, जळजळ, आम्लपित्त होणे, असे त्रास होण्यास सुरुवात होते.

श्वसनाला अडथळा

झोपल्यानंतर अन्न वर येणे. घोरण्याचा आजार. यामध्ये शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन श्वास बंद पडण्याचा धोका असतो. त्यामुळे मृत्यू देखील होण्याचाही धोका असतो.

हृदयावर अतिरक्त ताण

वजनाचा हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण होऊन हृदयविकाराचे प्रमाण हे लठ्ठ लोकांमध्ये १५ टक्के जास्त आढळते.

हार्मोन्सचे असंतुलन

चयापचय क्रिया अतिरिक्त चरबीमधून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये बिघाड होणे. हार्मोन्सचे असंतुलन होणे यामुळे उच्च रक्तदाब, टाइप २ मधुमेहाचे, कोलेस्टेरॉलचे आजार, रक्तवाहिन्या आतून जाड होणे आणि विविध अवयव बंद पडण्याचा धोका असतो.


हेही वाचा – लठ्ठपणापासून त्रस्त; करा उर्ध्वहस्तोत्तासन


 

First Published on: January 21, 2020 6:00 AM
Exit mobile version