घरलाईफस्टाईललठ्ठपणापासून त्रस्त; करा उर्ध्वहस्तोत्तासन

लठ्ठपणापासून त्रस्त; करा उर्ध्वहस्तोत्तासन

Subscribe

दिवसातून चार ते पाच वेळा करा उर्ध्वहस्तोत्तासन

धावपळीच्या आयुष्यात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तसेच काळजी घ्यायला पुरेसा वेळ कोणाकडेही नसतो. हल्ली सगळ्यांच्या कामाची पद्धत ही बैठ्या स्वरूपाची असल्याने लठ्ठपणाची समस्या अधिकांना बळावत असते. यावेळी हा लठ्ठपणा कसा कमी करता येईल यासाठी अनेक उपाय केले जातात. काहीवेळा चुकीचे औषधं खाल्याने त्याचा शरीरावर दुष्परिणाम देखील बऱ्याचदा होतो. अशाप्रसंगी नेमकं काय करावं हे कळत नसते.

मात्र काही योगसाधनं तसेच व्यायाम केल्याने लठ्ठपणा घालवण्यास मदत होते. योगसाधनेतील उर्ध्वहस्तोत्तासन हे आसनं केल्यास लठ्ठपणाची समस्या दूर होऊन शरीर सुडौल बनवण्यास मदत होते.

- Advertisement -

हे आहेत उर्ध्वहस्तोत्तासन

  • उर्ध्वहस्तोत्तासन केल्यास लठ्ठपणा दूर करून शरीर सुडौल बनवण्यास मदत करते. कंबरेच्या बाजूला जमा झालेली चरबी कमी करून कंबरेचा आकार कमी करते. हे आसन नियमित करत राहिल्यास तुमच्या कंबरेवरची चरबी कधीही वाढणार नाही.
  • शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती करण्यास मदत करणारे हे आसन असून, त्याचा लाभ मधुमेहाशी सामना करताना होतो. यकृत आणि किडनीच्या आजारांपासून आराम देते.
  • हे आसन करणाऱ्याला पाठीच्या कण्याला येणारा बाक, कंबरेचे दुखणे, मानेचे दुखणे आणि खांदा आखडणे होत नाही. कंबरेमध्ये लवचीकता वाढते. आतड्यांची कार्यक्षमता वाढून पचनशक्ती सुधारते.
  • आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला मळ बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

असे करा उर्ध्वहस्तोत्तासन

  • दोन पायांमध्ये सुमारे एक ते दीड फूट अंतर ठेवून उभे राहा. दोन्ही हात समोर आणून हाताची बोट एकमेकांत गुंफा आणि हात वर घ्या. खांद्यांचा स्पर्श कानांना होईल अशा प्रकारे हात वरच्या दिशेने न्या.
  • आता हात वर खेचा आणि निश्वास सोडत कंबरेमधून तुमच्या उजव्या बाजूला झुका. या क्रियेत तुमचे गुडघे वाकणार नाहीत तसेच टाचाही वर येणार नाहीत याची काळजी घ्या.
  • जिवढे शक्य होईल तिवढे झुकल्यानंतर श्वासोच्छ्वासाची क्रिया सामान्य ठेवून डोळे बंद करा. कंबरेत त्या बाजूला जाणवणाऱ्या ताणाचा अनुभव घ्या.
  • शक्य तेवढा वेळ थांबल्यानंतर श्वास भरुन घेत हळूहळू पूर्वस्थितीत या. हीच क्रिया दुसऱ्या बाजूला झुकूनही करा. दिवसातून चार ते पाच वेळा दोन्ही बाजूंनी ही क्रिया करा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -