अशी पळवून लावा घरातील ‘पाल’

अशी पळवून लावा घरातील ‘पाल’

अशी पळून लावा घरातील 'पाल'

पालीची समस्या ही प्रत्येक घरात असते. पण, घरातील मोठ्या मंडळीच्या सांगण्यानुसार तिला मारले जात नाही. पण, घरात येणाऱ्या पालीची बऱ्याच लोकांना भीती देखील वाटते. तसेच पाल ही विषारी देखील असते. त्यामुळे ही पाल घरात राहणे धोकादायक असते. त्यामुळे ही घरातील पाल दूर करण्यासाठी पाहुया काही खास टीप्स.

अंड्याची टरफले

आपण जी अंडी खातो त्याची टरफले फेकून न देता. त्याचा पालीला पळवण्यासाठी वापर करा. ज्याठिकाणी पाल येते त्याठिकाणी अंड्याचे टरफल ठेवावी यामुळे पाल येत नाही.

मोरपीस

मोरपिसामुळे पाल घरात येत नाही. त्यासाठी प्रत्येक रुममध्ये पाल दिसते तिथे मोरपीस लावावे.

कांदा

कांद्याच्या वासाने पाल लवकर पळून जाते. त्यासाठी ज्याठिकाणी पाल येते त्याठिकाणी कांद्याच्या स्लाइस करुन लटकवावे. यामुळे पाल येत नाही.

लसूण

लसणाच्या वासाने पाल घरात येत नाही. पाल जिथे येते त्याठिकाणी लसणाच्या पाकळ्या ठेवाव्यात यामुळे पाल पळून जाण्यास मदत होते.

लालमिरची आणि मिरी पावडर

लालमिरची आणि मिरी पावडर समप्रमाणात घेऊन त्याचा स्प्रे तयार करुन जिथे जिथे पाल दिसते तिथे करावा पाल येणार नाही.

First Published on: November 30, 2020 6:32 AM
Exit mobile version