झटपट बनवा पोह्यांचे वडे

झटपट बनवा पोह्यांचे वडे

झटपट बनवा पोह्यांचे वडे

पोह्यांपासून अनेक पदार्थ बनवतात येतात. त्यामुळे आज आपण पोह्यांचे वडे कसे बनवतात हे पाहणार आहोत. हा घराच्या साहित्यात एक झटपट होणारा पदार्थ आहे.

साहित्य

१ कप पोहे, ढोबळी मिरची, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, लाल तिखट, हळद, मीठ, तेल

कृती

पहिल्यांदा १ कप पोहे तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ते १ मिनिटासाठी भिजवायला ठेवायचे आहे. पोहे भिजल्यानंतर त्यामधले पाणी काढून घ्यायचे. मग पाणी काढून झाल्यानंतर पोह्यांवर झाकण ठेवून ५ मिनिटे मुरवायचे. त्यानंतर पोहे नीट भिजल्यानंतर एका ताटात पोहे काढून घ्यायचे आणि मग हाताने बारीक करून ते मळून घ्यायचे. पोहे मळून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची दोन चमचे घालायची. त्यानंतर थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा. मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. यानंतर थोडेसे जिरे, अर्धा चमचा लाल तिखट, चिमुटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे. मग हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचे. हे सर्व मिश्रण मळून झाल्यानंतर त्याचे छोडे-छोडे वडे करायचे. वडे बनवून झाल्यानंतर ते गरम तेलात खरपूस होईपर्यंत तेलून घ्यायचे. हे वडे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता.

First Published on: September 24, 2020 7:31 AM
Exit mobile version