चविष्ट ब्रेड उत्तप्पा

चविष्ट ब्रेड उत्तप्पा

दररोज नाश्ता तयार करताना अनेकदा गृहीनींना नाश्तासाठी काय वेगळे करायचे हा प्रश्न पडतो. दररोजच्या पोहे आणि उपमापेक्षा एक वेगळी रेसीपी आज जानून घेणार आहोत. यासाठी चटपटीत ब्रेडचा उत्तप्पा रेसिपी पुढील प्रमाणे.

साहित्य-

ब्रेड, ३ चमचे जाड रवा, तांदूळ, मैदा, दही, मीठ, जिरे, काळी मिरीपूड, बारीक चिरलेला टोमॅटो,गाजर, हिरव्या मिरच्या, आले, तेल गरजेनुसार.

कृती-

ब्रेडच्या कडा काढून ब्रेडचे स्लाईस करून घ्या ते एकत्रीत तांदूळाचे पीठ, मीठ, दही, पाणी घालून मिक्स करून याची एकत्रीत पेस्ट तयार करा. या पेस्टसोबत पीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी वापरून ते मळून घ्या. यात चिरलेले टोमॅटो, गाजर, आले, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरे घलून एकत्रीत मिक्स करा. गॅसवर मंद आचेवर चमच्याने तेल घालून तयार पीठाचे उत्तप्पे तयार करून घ्या. अशा प्रकारे चवीष्ट उत्तप्पा खाण्यासाठी तयार होतात.

First Published on: March 5, 2020 6:00 AM
Exit mobile version