टेस्टी ‘जवळा’ भात नक्की ट्राय करा

टेस्टी ‘जवळा’ भात नक्की ट्राय करा

टेस्टी 'जवळा' भात नक्की ट्राय करा

आतापर्यंत आपण चिकन बिर्याणी, मटन बिर्यानी, कोलंबी भात असे भाताचे विविध प्रकार बघितले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला जवळा भात कसा बनवायचा ते सांगणार आहोत. कमी वेळात झटपट बनणारा जवळा भात मासे खवय्यांना सर्वाधिक प्रिय असतो. पावसाळ्यात तर सुकी मच्छी विशेष करून खाल्ली जाते. त्यावेळी हा जवळा भात बऱ्याच घऱात आवर्जून बनवला जातो.

साहित्य

कृती

एका पसरट भांड्यात अथवा कढईत तेल गरम करावे. कढीपत्त्याची फोडणी द्यावी. नंतर बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा लालसर झाला की त्यात आलं लसून पेस्ट टाकून परतून घ्यावा. नंतर टोमॅटो टाकावा. टोमॅटो शिजल्यावर लाल तिखट, हळद, मीठ टाकावे. त्यानंतर त्यात जवळा आणि कोकम टाकावे. प्रमाणात पाणी टाकून जवळा शिजवून घ्यावा. नंतर त्यात शिजवलेला भात टाकावा आणि नीट परतून घ्यावा. मंद आचेवर भात शिजू द्यावा. कोथिंबीर टाकून गरमागरम खाण्यास द्यावा.


हेही वाचा – पालक खिचडी खा, फिट राहा


 

First Published on: May 29, 2021 6:11 PM
Exit mobile version