ज्वारीची इडली

ज्वारीची इडली

ज्वारीची इडली

आतापर्यंत आपण ज्वारीपासून भाकरी बनवतात हे बघितलं आहे आणि ज्वारीची भाकरी खाल्लेलीही आहे. पण आज ज्वारीपासून इडली कशी बनवायची हे आपण बघणार आहोत.

साहित्य

१ कप ज्वारी, १ कप तांदूळ, १ कप उडीदडाळ, १ कप रवा, एक चिमूट खायचा सोडा, चवीनुसार मीठ,  तेल.

कृती

तांदूळ, उडीदडाळ, ज्वारी स्वच्छ पाण्यात धुऊन घ्या. नंतर ७ तास वेगवेगळी पाण्यात भिजवा.नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात रवा, मिक्स करा आणि ढवळून घ्या. सकाळी या पीठात मीठ आणि सोडा घाला. इडली पात्रात इडली बनवा. हिरवी चटणी आणि सांबरबरोबर सर्व्ह करा.


First Published on: June 14, 2021 10:59 AM
Exit mobile version