घरताज्या घडामोडीकच्च्या केळ्याचे कटलेट

कच्च्या केळ्याचे कटलेट

Subscribe

केळ आरोग्यवर्धक असून प्रकृतीसाठी उत्तम आहे. तसेच सध्याच्या दिवसांत डॉक्टरही रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतानाच दुपारच्या जेवणानंतर दोन केळी खाण्याचाही सल्ला देत आहेत. यामुळे आज केळ्यापासून कटलेट कसे बनवायचे याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साहित्य

- Advertisement -

४ कच्ची उकडलेली केळी, १ वाटी मटर, पाव कप मैदा, १ टीस्पून भाजलेले  शेंगदाणे, २ टेबल स्पून कॉर्न फल्ॉवर, ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १ टेबल स्पून लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काळी मिरी, १ चमचा लिंबाचा रस. अर्धा चमचा तिळ, मीठ चवीनुसार, तळणासाठी तेल. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबिर.

कृती

- Advertisement -

उकडलेल्या केळ्याचे साल काढून घ्या. नंतर कुस्करुन घ्या. एका बाऊलमध्ये कुस्करलेले केळ्यात मटर, शेंगदाण्यचा कूट, लाल तिखट, कॉर्न फ्लॉवर, लिंबाचा रस, धने पावडर, तीळ, मीठ, कोथिंबीर, टाकून एकत्र मळून घ्या. नंतर या पीठाचे गोल चपटे गोळे करा. (कटलेट), मंद आचेवर नॉनस्टीक पॅनमध्ये शॅलो फ्राय करा. उपवासासाठीही हे कटलेट बनवू शकता. फक्त त्यात गरम मसाला टाकून नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -