ओव्याच्या पानांची भजी

ओव्याच्या पानांची भजी

ओव्याच्या पानांची भजी

भजी म्हटलं की तेलकटपणा आलाच. यामुळे खोकला होऊ नये म्हणून बरेच जण इच्छा असूनही भजी खाणं टाळतात. पण ओव्याच्या पानांची भजी ही जिभेची चव तर वाढवतातच शिवाय आरोग्यदृष्ट्या फायदेशीरही असतात. यामुळे या पावसाळ्यात ही भजी खाण्यास हरकत नाही.

साहित्य

१० ओव्याची पाने, अर्धा वाटी बेसन, २ चमचे तांदळाचे पीठ, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, एक चमचा तिखट, एक चमचा धने पावडर, एक चमचा जिरे पावडर, १ चमचा
सफेद तीळं.

कृती

एका पातेल्यात भज्याचे पीठ भिजवावे. त्यात वरील सर्व जिन्नस टाकावेत. एक एक पानं त्यात बुडवून त्याची गरमागरम तेलात भजी तळावी. सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर खाण्यास द्यावी. ओव्यात औषधी गुण असल्याने ही भजी बाधत नाहीत.


हेही वाचा –  मिक्स व्हेजिटेबल भजी नक्की ट्राय करा


 

First Published on: June 12, 2021 7:00 AM
Exit mobile version