बीट पासून बनवा टेस्टी हलवा

बीट पासून बनवा टेस्टी हलवा

बीट हे कंदमूळ असून बीटाच्या सेवनाने हिमोग्लोबीन वाढते. यामुळे सॅलेडमध्ये बीटाचा वापर केला जातो. तसेच बीटाची कोशिंबीरही बनवली जाते. पण आम्ही तुम्हाला बीटापासून हलवा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

४ मध्यम आकाराचे किसलेले बीट, १ कप दूध, १ कप तूप, तीन वाटी साखर, चार हिरवी वेलची, गरजेनुसार काजू

कृती

सर्वप्रथम पातेल्यात किंवा कढईत तूप गरम करून घ्या. नंतर त्यात किसलेले बीट टाका. चांगले परतून घ्या. नंतर त्यात दूध टाका. मिश्रण चांगल एकजीव परतून घ्या. बीट शिजत आले की साखर टाका. परतून घ्या. नंतर हिरवी वेलची आणि काजू टाकून सजवा.


हेही वाचा – संत्र्याच्या सालाची टेस्टी भाजी


First Published on: June 23, 2021 7:00 AM
Exit mobile version