लॉकडाऊनमध्ये तुमचीही मुलं चिडचिड करतायत? मग करा असं

लॉकडाऊनमध्ये तुमचीही मुलं चिडचिड करतायत? मग करा असं

लॉकडाऊनमध्ये तुमचीही मुलं चिडचिड करतायत? मग करा असं

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण घरात बसले आहेत. तर घरातील काही जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे त्यांचा कामात वेळ जात आहे. तर महिला वर्ग वेगवेगळ्या रेसिपी करण्यात व्यस्त आहेत. मात्र, यामुळे चिमुरड्यांची फारच चिडचिड होत आहे. कारण त्यांना घराबाहेर पडताही येत नाही आणि त्यांच्यासोबत कोणी खेळतही नाही. त्यामुळे मुले फारच चिडचिड करत असल्याचा अनेक पालकांना अनुभव येत आहे. परंतु, या मुलांना कसे समजून घ्यावे, असा प्रश्न अनेक पालकांना पडला आहे. पण, काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. त्यामुळे मुलांचा वेळ छान जाण्यास मदत होईल.

मुलांकडे अधिक लक्ष द्या

सध्या मुलांना शाळा किंवा कॉलेज नसल्यामुळे मुलांचे रुटीन बदले आहे. तसेच सकाळी उठण्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा सर्वच बदले आहे. त्यामुळे अशावेळी मुलांना त्यांच्या कलेने घेणे फार गरचेचे आहे. त्यांच्यावर लक्ष ठेऊन त्यांना आपल्यातील थोडा वेळ द्या.

मुलांच्या आवडीनिवडी विचारा

मुलांना वेळ देऊन त्यांना काय आवडत? काय नाही आवडत? याबाबत विचारणा करा. त्यांना त्यांच्या आवडीचे खाऊ द्या आणि त्यांच्यासोबत ते खा. कारण मुलही खूश होतील.

गोष्टी सांगा

तुमच्या मुलांसोबत तुम्ही गप्पा मारा. तसेच मुलांसोबत डान्स करा. त्यांना छान छान गोष्टी सांगा. तसेच त्यांच्याकडून तुम्हीही गोष्टी ऐका आणि त्यांना त्यावर प्रतिक्रिया द्या. यामुळे तुमची मुले एकाच जागी बसतील आणि त्यांचा वेळ देखील छान जाईल. त्याचप्रमाणे तुमच्या लहानपणीच्या गोष्टी त्यांना सांगा त्यामुळे त्यांनाही त्या ऐकायला फार मज्जा येईल.

मुलांसोबत व्यायाम करा

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येकाकडे वेळ आहे. त्यामुळे अनेक जण काहींना काही बनवून खात आहेत. मात्र, ते पचन होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच आपली तब्येत देखील फिट राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दररोज व्यायाम करा आणि आपल्या मुलांना देखील व्यायाम करण्यास सांगा. त्यामुळे मुले देखील फिट राहतील.


हेही वाचा – स्टडी फ्रॉम होम : लॉकडाऊनमध्ये शाळा- क्लासेसकडून ऑनलाईन लेक्चर 


 

First Published on: April 24, 2020 8:18 PM
Exit mobile version