Monday, May 6, 2024
घरमानिनीBeauty Tips : हाता पायाचे टॅनिंग कसे घालवाल, वापरा 'या' टीप्स

Beauty Tips : हाता पायाचे टॅनिंग कसे घालवाल, वापरा ‘या’ टीप्स

Subscribe

सूर्याच्या कडक किरणांमूळे शरीराचे हात आणि पाय जास्त काळे पडतात. तसेच उन्हात राहिल्यामुळे टॅनिंगच्या समस्येला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. सतत उन्हात राहिल्याने केवळ चेहराच नाही तर हात-पायांची त्वचाही काळी पडते.

आपण सगळे शरीराच्या प्रत्येक महत्वाच्या भागांकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असतो. अशातच शरीराचे हात आणि पाय ह्याकडे जास्त लक्ष देत नाही. आणि अशातच ते हात आणि पाय नेहमी उघडे असतात. यासोबतच हाता पायांचा जास्त वापर आपल्या कडून होत असतो आणि ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतं. तसेच हाता-पायांची कशा पद्धतीने काळजी तुम्ही घरच्या घरी घेऊ शकतात. हे आता आपण जाणून घेऊया.

Woman Hand Applying SPF Sun Protection Cream on Tanned Legs Relaxing Sand  Beach Seaside Closeup, Stock Footage

- Advertisement -

‘या’ गोष्टींचा करा वापर-

१. लिंबूचा करा वापर-

- Advertisement -
  • हात आणि पायांचे टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबाचा वापर करू शकता.
  • लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
  • यासाठी दोन चमचे लिंबाच्या रसामध्ये दोन चमचे गुलाबजल मिसळा.
  • नंतर कापसाच्या साहाय्याने हात आणि पायांवर लावा.

290+ Limbu Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock

२. बटाट्याचा रस-

  • हात आणि पायांची त्वचा उन्हामध्ये खूप काळवंडते. यासाठी बटाट्याचा रस खूप फायदेशीर ठरू शकतो.
  • बटाट्यामधे ब्लीचिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेचा काळेपणा दूर होतो.
  • यासाठी बटाटा हा सोलून घेऊन त्याचा रस हात आणि पायांवर लावा.
  • यांनतर थोडा वेळ कोरडा होऊ द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

Permanent Skin Whitening Remedy with Boiled Potato | Remove Sun Tan | Get  Fair Skin in 10 Minutes - YouTube

३. कोरफडीचा करा वापर-

  • कोरफड ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
  • त्वचेचे डाग दूर करण्यासाठी कोरफडीचा खूप फायदा होतो. तसेच त्वचेचा टोन सुधारतो.
  • रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचे जेल लावल्याने त्वच्या खूप चांगली राहते.
  • यामुळे त्वचेचा काळेपणा दूर होतो आणि त्वचा चमकदार राहते.

Best Aloe Vera Gel For Face To Prevent From Tanning

4. दह्याचा करा वापर-

  • हात आणि पायांच्या टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी दही हा उत्तम पर्याय आहे.
  • दही त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासोबतच त्वचा उजळण्यासही मदत करते.
  • यासाठी 3 चमचे दह्यात अर्धा चमचा हळद मिसळा.
  • ही पेस्ट हात आणि पायांवर लावा.
  • यांनतर 15 ते 20 मिनिटांनी ते स्वच्छ पाण्याने धुवून टाका.

Yogurt Body Masks For Skin - Boldsky.com


हेही वाचा :

Devgad Hapus : देवगडचा अस्सल हापूस आंबा कसा ओळखाल ?

- Advertisment -

Manini