Tuesday, April 23, 2024
घरमानिनीDevgad Hapus : देवगडचा अस्सल हापूस आंबा कसा ओळखाल ?

Devgad Hapus : देवगडचा अस्सल हापूस आंबा कसा ओळखाल ?

Subscribe

देवगड हापूस आंबा कसाओळखाल,आणि काय आहेत नेमकी वैशिष्ट्य. जाणून घ्या.

अस्सल देवगड हापूस आंबा हा कसा ओळखायचा असा महत्वाचा प्रश्न आहे. कोकणातला हापूस आंबा हा गावी गेल्यावर आपणच खातो आणि आपल्या जर मुंबईत आलेला आंबा जर देवगडचा खायचा असेल तर त्या साठी आपण तो कसा ओळखायचा हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रामुख्याने रत्नागिरी, मालवण, सिंधुदूर्ग, देवबाग, खेड या ठिकाणी मिळणारे हापूस आंबे हे फारच प्रसिद्ध आहेत. अनेकदा पेटी हापूस आंबे म्हणून जी पेटी आपण घेतो. पण मग हे आंबे चवीला तसे लागत नाहीत. मग आपल्याला कळतं की, हे आंबे कोकणातले आहेत कि बाकी कोणत्या ठिकाणचे.

Ratnagiri Alphonso Mango Devgad alphonso Excellent A1Quality

- Advertisement -

तर मग आता तुम्ही म्हणाल नेमका हापूस आंबा ओळखायचा कसा. तर आज जाणून घेऊया हापूस आंबा ओळखण्याची योग्य पद्धत-

  • आकारावरुन ओरिजनल हापूस आंबा ओळखण्याची ही एक पद्धत आहे. ती म्हणजे आंब्याचा आकार हा वेगळा असतो.
  • विशेष म्हणजे देवगड हापूस आंब्याचा आकार हा एखाद्या कोयरीप्रमाणे असतो.
  • तसेच त्याचे देठ लहान आणि तोंड निमुळतं असतात.
  • रत्नागिरीचा अस्सल हापूस आंबा असेल तर त्याची साल ही जाड असते त्याचे वजन 200 ते 250 ग्रॅमच्या इतके असते.
  • देवगड हापूस आंब्याच्या रंग हा पिवळा धम्म्क असतो.
  • देवगड हापूस हा देठाकडून छान केशरी रंगाचा असतो.
  • तसेच तो जसा पिकत जातो तसा त्याचा रंग अधिक केशरी होत जातो.
  • हापूस आंबा हा खाल्ल्यानंतर तो थोडा चुरचुरीत लागतो.
  • हा आंबा खाल्यानंतर तुमची जीभ थोडी चुरचुरते.
  • आंबा हा थोडा अॅसिडीक असतो. त्यामुळे त्याची चव थोडी वेगळी लागते.
  • हापूस आंब्यामध्येही रेषा म्हणजे धागे असतात.
  • हल्ली केशल आंब्यामध्येही असे धागे असतात.
  • पण हापूस आंब्यात रेषा फार मोठ्या नसतात. हापूर आंब्याची कोय ही फार मोठी नसते.

हेही वाचा :

pregnancy Food : प्रेग्नन्सीमध्ये कणीस खाणे आरोग्यास हितकारक

- Advertisment -

Manini