बाळाच्या स्वागतासाठी असं सजवा घर

बाळाच्या स्वागतासाठी असं सजवा घर

आपल्या नव्या बाळाला घरी आणण्याचा अनुभव हा फार गोड असतो. परंतु तो घरी येण्याआधी त्याची खोली सजवली जाते. त्याच्यासाठी मऊ गादी, पाळणा, खेळणी अशा काही गोष्टी सुद्धा ठेवल्या जातात. बाळाला त्रास होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाते. अशातच चिमुकल्याचे घरी स्वागत करणार असाल तर घरं कसे सजवाल याच बद्दलच्या काही खास आयडियाज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

-अनुभवी आईशी बोला


बाळासाठी घर सजवायचे असेल तर तुम्ही आधी तुमच्या ज्या कोणीही मैत्रिणी आई झाल्या आहेत त्यांच्याशी चर्चा करु शकता. तसेच ती काही गोष्टी सांगेलच. पण तुमची आणि बाळाची गरज ही वेगळी असू शकते. अशावेळी तुम्हाला तिचे अनुभव कामी येतील.

-घर डेकोर करा

नवे बाळ घरी येणार असेल तर घराची सजावट नक्कीच करा. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुलांची रांगोळी काढा किंवा फुगे लावून तुम्ही डेकोरेशन करु शकता.

-हा क्षण कॅप्चर करा


चिमुकल्याचे घरी स्वागत होत असतानाचे काही क्षण तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॅमेऱ्यात टीपा. जेणेकरुन तुम्ही ते नंतर ही पाहिले तरीही बाळाच्या आगमानावेळी किती उत्सुकता होती हे पाहून तुम्हाला आनंद होईल.

-घरच्या घरी छोटी पार्टी ठेवा


बाळ घरी आल्याच्या आनंदात तुम्ही घरच्या घरी एक लहान सेलिब्रेशन ठेवू शकता. खासकरुन गोडाचे पदार्थ यावेळी नक्की बनवा.


हेही वाचा- बाळाच्या स्वागतासाठी असं सजवा घर

First Published on: May 10, 2023 3:31 PM
Exit mobile version