जीभेच्या रंगावरून ओळखा तुमचे व्यक्तिमत्व

जीभेच्या रंगावरून ओळखा तुमचे व्यक्तिमत्व

ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह, राशी, नक्षत्र, कुंडली यांच्याबद्दल ज्ञान दिले जाते. त्याच प्रकारे समुद्र शास्त्रामध्ये मानवी शरीराबद्दल अनेक रहस्य सांगितले जातात. त्यामध्ये व्यक्तीच्या रंगापासून ते केस, उंची यांसारख्या शरीराच्या संपूर्ण शरीराबाबत रहस्यांचे वर्णन केले जाते. आज आम्ही तुमच्या जीभेच्या रंगाबाबत काही रहस्य सांगणार आहोत. समुद्र शास्त्रानुसार जीभेच्या रंगावरुन व्यक्तीचा स्वभाव, अवगुण यांबाबत सांगितले जाते.

जीभेच्या रंगावरुन ओळखा तुमचे व्यक्तित्व

काळी जीभ

समुद्र शास्त्रानुसार ज्यांची जीभ नेहमी काळसर असते. अशा व्यक्तींना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या करिअरमध्ये ताण-तणावाचा सामना करावा लागू शकतो.

पिवळी जीभ

ज्या व्यक्तींच्या जीभेचा रंग सतत पिवळा असतो. त्यांना सतत आरोग्यासंबंधीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या व्यक्तींची तर्क शक्ती कमजोर असते.

दोन रंगाची जीभ

ज्या व्यक्तींची जीभ दोन रंगाची असते. ते व्यक्ती पटकन कोणावरही विश्वास ठेवतात आणि वाईट संगतीत पडतात.

जाड जीभ

ज्या व्यक्तींची जीभ जाड असते. त्यांची वाणी कठोर असते. शिवाय अशा व्यक्तींचा स्वभाव रागीट असतो.

लाल जीभ

समुद्र शास्त्रानुसार, ज्या व्यक्तींची लाल किंवा गुलाबी रंगाची असते ते नेहमी व्यक्ती निरोगी असतात. अशा व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. त्यांचे आयुष्य सुखी-समाधानी असते.


हेही वाचा  :

पातळ केस असणाऱ्या स्त्रिया असतात भाग्यवान; करिअरमध्ये मिळवतात यश

First Published on: January 8, 2023 2:01 PM
Exit mobile version