Coronavirus: ‘कोरोनाच्या मृत्यूला हे आहे कारण? भारतीयांनी जीवनशैलीत बदल करावा’

Coronavirus: ‘कोरोनाच्या मृत्यूला हे आहे कारण? भारतीयांनी जीवनशैलीत बदल करावा’

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देश हैराण झाले आहेत. आतापर्यंत ३५ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी २ लाख ४५ हजार रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. या मृत्यूंना चुकीचा आहार जबाबदार असल्याचे ब्रिटनमधील भारतीय वंशाचे डॉक्टर आणि हृदय रोग तज्ज्ञ डॉ. असीम मल्होत्रा यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पॅक फूडचा कमी प्रमाणात वापर केला पाहीजे. तसेच स्थूलपणा आणि गरजेपेक्षा जास्त वजन कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. भारताने देखील या समस्येकडे गंभीरतेने पाहीले पाहीजे, असे ते म्हणाले.

४२ वर्षीय डॉ. मल्होत्रा हे ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) या संस्थेतील नामवंत डॉक्टर आहेत. ते म्हणाले की, भारतात देखील जीवनशैलीशी निगडीत अनेक आजार आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत देखील संवेदनशील आहे. कोरोना व्हायरसशी लढा द्यायचा असेल तर भारतीयांना जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहेत.

डॉ. मल्होत्रा हे दिल्लीतील रहिवासी होते, त्यांना भारतीयांच्या आहारपद्धतीबद्दल चांगले ज्ञान आहे. “टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय रोग असणाऱ्यांना कोविड १९ चा धोका सर्वाधिक आहे. याचे कारण स्थूलपणा आणि मेटाबोलिज्मशी संबंधित विकार आहेत. अमेरिका आणि ब्रिटन सारख्या पश्चिमी देशांमध्ये या घातक व्हायरसमुळे मृत्यू दर अधिक आहे. जीवनशैलीशी संबंधी आजारमुळे हे होत आहे.”, असे सांगताना ते म्हणाले की, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ६० टक्के वृद्धांमध्ये अधिक वजनाची समस्या आहे.

मल्होत्रा पुढे म्हणाले की, जीवनशैलीतील बदल आपल्या आरोग्यावर अधिक प्रभाव टाकत असतो. यामुळे आपल्या शरिराला औषधाची कमी गरज लागते. त्यांनी अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्याचा अतिवापर बंद करण्याचा सल्ला दिला आहे. पाकिद बंद खाद्यपदार्थात साखर, आरोग्यास घातक तेल आणि प्रिजर्वेटीव्हचा अधिक समावेश असतो. त्यामुळे भारतीय नागरिकांना मी एवढेच सांगने की त्यांनी अशाप्रकारचे खाद्यपदार्थ बंद करावेत.

बंद पाकिटातील खाद्यपदार्थ बंद करण्यासोबतच डॉक्टर मल्होत्रा यांनी भारतीयांनी उच्च कार्बोहायड्रेट असलेल्या अन्नपदार्थाचे जरा बेतानेच सेवन करण्यास सांगितले आहे. कारण भारतीय हे खूप जेवत असतील तर ते अन्न देखील नुकसानकारक होऊ शकते. कारण ते शरिरातील शर्करा आणि इन्सुलिनला वाढवते. ज्यामुळे टाइप २ चा मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या आजारांना निमत्रंण मिळते. त्यामुळे भारतीयांनी जेवणात भाज्या, फळे यांचा समावेश केला पाहीजे, असा सल्ला डॉ. मल्होत्रा यांनी दिला.

First Published on: May 3, 2020 7:55 PM
Exit mobile version