स्वयंपाक घराची स्वछता

स्वयंपाक घराची स्वछता

Kitchen Cleaning

* स्वयंपाक घरात स्वतंत्र डस्टबिन ठेवा. ते नेहमी स्वच्छ असेल, याची काळजी घ्या. ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या कागदी पिशवीत भरूनच टाका.

* स्वयंपाकघरातील टाईल्स धुण्यासाठी डिटर्जंटचा वापर करता येईल.

* स्वयंपाकघरातील तेलाचे डाग पुसून काढण्यासाठी स्क्रबरचा वापर करता येईल.

* फ्रीज पुसण्यासाठी मऊ स्पंजचा वापर करा.

* स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅनवर बसलेला तेलाचा आणि धुळीचा राब पुसून काढणं खूप कठीण असतं. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्या पाण्यात थोडा वेळ हा फॅन ठेवून द्यावा. त्यानंतर व्हाईट व्हिनेगरने हा पंखा पुसून काढावा.

* मिक्सर, ग्रायंडर, माइक्रोवेव्ह व स्विच बोर्ड सारखी नेहमी वापरात असलेली उपकरणे स्वच्छ करण्यासाठी 2 लहान चमचे लिक्विड ब्लीच मिसळून स्वच्छ मुलायम कपड्याने पुसावे. उपकरणे नवीन दिसतील.

* फ्रिज व शेल्फवरील वृत्तपत्रे बाजूला करून त्या जागी नवीन मॅट्स लावावी.

First Published on: February 1, 2019 5:50 AM
Exit mobile version