खमंग डाळीचे फुणके

खमंग डाळीचे फुणके

काही दिवसांवरच होळी येतेय, दरवर्षी होळीला आपण पुरणपोळी खातोच. मात्र यावर्षी आपण होळी स्पेशल पाहुया चना आणि मुगाच्या डाळीचे फुणके.

साहित्य-

एक वाटी चना डाळ, एक वाटी मुग डाळ
मिरची
हळद
जीरे एक चमचा
आले, लसून
हिंग एक चमचा
मीठ चवीनुसार
एक वाटी कोथींबीर
दोन कांदे
गरम पाणी

कृती- चना डाळ आणि मुग डाळ ५ तास भिजत ठेवणे, त्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेली मिरची, हळद, एक चमचा जीरे, एक चमचा हिंग, आले लसून, दोन बारीक चिरलेले कांदे, एक वाटी कोथींबीर, चवीनुसार मीठ हे मिश्रण एकत्रीत करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. त्यानंतर बारीक केलेल्या मिश्रणाचे गोळे करून १५ ते २० मिनिट मंद आचेवर वाफवावे. त्यानंतर तेलात शॅलो फ्राय करावे. अश्याप्रकारे खंमग चना डाळ आणि मुग डाळीचे फुणके तयार.

First Published on: March 9, 2020 6:00 AM
Exit mobile version