उन्हामुळे ओठांचे नुकसान होत असेल तर ‘या’ टीप्स वापरा

उन्हामुळे ओठांचे नुकसान होत असेल तर ‘या’ टीप्स वापरा

फाटलेल्या ओठांमुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडले जाते. उन्हाळ्यात हाइड्रेशनच्या कारणास्तव ओठ ड्राय होतात. काही वेळेस ओठ फुटले जातात. अथवा ब्लिडिंग सुद्धा होते. जर तुम्हाला मुलायम आणि गुलाबी लिप्स हवे असतील तर पुढील काही घरगुती उपाय करू शकता.

दूध आणि हळदीची पेस्ट
ड्राय ओठांची समस्या दूर करण्यासाठी एक चमचा दूधात एक चिमूटभर हळद मिक्स करुन ओठांना लावा. खरंतर हळदीत करक्यूमिन आणि दूधात असलेले मॉइश्चराइजिंग प्रॉपर्टीच ओठांची त्वचा कोमल करण्यास मदत करते.

हनी आणि लेमन
अँन्टी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज युक्त लिंबूत व्हिटॅमिन सी असते. जे त्वचेला नरिशमेंटसाठी लाभदायक असते. यासाठी लिंबूचे दोन भागात कापा. आता लिंबूवर मध किंवा साखर लावून ओठांना लावून काही वेळ तसेच ठेवा. त्यानंतर ओठ ओल्या कापडाने स्वच्छ करा.

नारळाचे तेल
फाटलेले ओठ हाइड्रेड ठेवण्यासाठी नारळाचे तेल वापरू शकता. नारळाच्या तेलाच्या काही थेंबाने लिप्सला मसाज करा. त्यानंतर तेल ओठांना लावून ठेवा. यामध्ये असलेले मॉइश्चर लिप्सच्या स्किनला सॉफ्ट आणि हेल्दी बनवण्याचे काम करते.

एलोवेरा जेल
ओठांची स्किन रिपेयर करण्यासाठी एलोवेरा जेल एक उत्तम उपाय आहे. कुलिंग त्वत्वांनी भरपूर असलेल्या एलोवेरा जेलमध्ये एक चिमुटभर दालचिनी मिक्स करा. आता ही पेस्ट ओठांना अप्लाय करा आणि तसेच ठेवा. यामुळे ओठांचे ड्रायनेस दूर होईल.

शिया बटर
ओठांचा ड्रायनेस दूर करण्यासाठी शिया बटर उत्तम ऑप्शन आहे. ते ओठांना लावल्यास सूज, दुखणे आणि जळजळची समस्या दूर होते. ओठांची त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी याचा नियमित वापर करावा.


हेही वाचा- घरात असलेल्या ‘या’ गोष्टींपासून बनवा स्क्रब, मिळेल चमकदार त्वचा

First Published on: September 14, 2023 2:47 PM
Exit mobile version