वारंवार स्नायू दुखत असतील तर शरिरात ‘या’ गोष्टीची असू शकते कमतरता

वारंवार स्नायू दुखत असतील तर शरिरात ‘या’ गोष्टीची असू शकते कमतरता

लहानपणापासूनच मुलांना दूध पिण्याची सवय लावली जाते. जेणेकरुन शरिरातील कॅल्शिअमची कतरता पूर्ण होते आणि हाडं मजबूत होतात. कॅल्शिअम आपल्या शरिरातील फार महत्वाचे घटक मानले जाते. कॅल्शिअम आपली हाडं, दात आणि मसल्सला मजबूत ठेवण्यासाठी फार आवश्यक असतात. वाढत्या वयासग महिलांमध्ये ऑस्टियोपोरोसिस आणि हाड कमजोर होण्याचा धोका अधिक वाढतो. शरिरात कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे काही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याचसोबत याचे संकेत आणि लक्षण सुद्धा दिसण्यास सुरुवात होते. तर जाणून घेऊयात कॅल्शिअमची कमतरता असल्यास कोणते संकेत दिसू लागतात.

-हातापायाला झिणझिण्या येणे


कॅल्शिअमची कमतरता असल्यास हातापायाला झिणझिण्या येणे आणि सुन्न होण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जेव्हा तुमच्या शरिरात कॅल्शिअम हळूहळू कमी होते तेव्हा हे संकेत दिसण्यास सुरुवात होते.

-थकवा

कोणतेही काम केल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल, तुमची झोप पूर्ण होत नसेल किंवा झोप येत नसेल तर समजून जा की, कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे असे होत आहे .

-दात खराब होणे


कॅल्शिअम हे दातांसाठी फार महत्वाचे आहे. अशातच शरिरात कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे दात कमजोर होतात आणि ते खराब होण्याची शक्यता अधिक वाढते. कॅल्शिअमच्या कमतरेमुळे तुमच्या दातांमध्ये सेंसिटिविटी किंवा दुखण्यास सुरुवात होऊ शकते.

-ऑस्टियोपोरोसिस


ही अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये हाड कमजोर आणि तुटतात. असे शरिरात कॅल्शिअमचा स्तर कमी झाल्याच्या कारणास्तव होते. यामुळे फ्रॅक्चर आणि हाडांसंबंधित दुखापत होण्याची शक्यता अधिक वाढते. महिलांमध्ये मेनोपॉजनंतर ऑस्टियोपोरिसिसचा धोका अधिक वाढतो. कारण एस्ट्रोजनचा स्तर कॅल्शिअमच्या अवशोषणासाठी बाधा निर्माण करतात.

-नखं आणि केसांवर परिणाम


मजबूत केस आणि नखांसाठी कॅल्शिअमला अधिक गरजेचे मानले जाते. शरिरात कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे केस आणि नखं सहज तुटतात. याव्यतिरिक्त केसांची चमक निघून जाते.

 


हेही वाचा: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटामिनच्या गोळ्या घेणे पडेल महाग?

First Published on: April 15, 2023 1:58 PM
Exit mobile version