Thursday, May 9, 2024
घरमानिनीडॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटामिनच्या गोळ्या घेणे पडेल महाग?

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटामिनच्या गोळ्या घेणे पडेल महाग?

Subscribe

शरिराला पोषक तत्वांची पूर्तता करण्यासाठी न्युट्रिशनल सप्लिमेंट घेणे ही काय नवी गोष्ट नाही. कारण बाजारात विविध प्रकारच्या ब्रँन्डचे सप्लिमेंट उपलब्ध आहेत. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला विटामिन, खनिज, कॅल्शियम, लोह आणि प्रोटीन सारख्या पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करत असल्याचा दावा करतात. परंतु डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, हे सप्लिमेंट संतुलित आहाराची कमतरता पूर्ण करु शकत नाहीत. त्यांचे असे म्हणणे आहे की, वयाच्या ३० व्या वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या महिला असे सप्लिमेंट घेत असल्याचे प्रमाण वाढले आहे.

परंतु शाहाकारी लोकांसाठी मल्टिविटामिनची सुद्धा गरज असते. परंतु सर्वांनाच समान पद्धतीच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते असे नाही. अशातच डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे. कारण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या घेतल्यास तर त्याचे नुकसान ही आहेत.

- Advertisement -

सप्लिमेंटचा शरिरावर होणारा परिणाम
सप्लिमेंट अधिक प्रमाणात घेतल्यास त्याचे आरोग्यावर ही परिणाम होतात. त्यामुळे डॉक्टर ज्या सप्लिमेंटच घेण्याचा सल्ला देतात ते तेवढ्याच प्रमाणात घ्यावे.

- Advertisement -

व्हिटामिन
व्हिटामिन म्हणजे जे फॅट सोल्यूबल असतात जसे की, विटामिन ई आणि ओमेगा थ्री. या विटामिनला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास शरिरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.

व्हिटामिन ए आणि व्हिटामिन ई
व्हिटामिन ए च्या अतिवापरामुळे उलटी, अंधुक दिसणे अशा समस्या उद्भवू शकतात. तर विटामिन ई मुळे बीपी कमी होतो. ते फुफ्फुसांवर सुद्धा परिणाम करतात. अशातच जेवढ्या वेळासाठी आणि ज्या प्रमाणात सांगितले आहेत तेवढेच घ्यावे.

व्हिटामिन बी
हे व्हिटामिन शरिरात लाल रक्त कोशिका तयार करण्यास मदत करतात. तर डोक आणि तांत्रिक कोशिका सुद्धा मजबूत करण्यास मदत करतात. हे दोन्ही रुपात उपलब्ध असतात. परंतु त्यांचा डोस कमी असतो. तर मधुमेहाच्या रुग्णालयाला सुद्धा असे विटामिन दिले जातात. परंतु दीर्घकाळापर्यंत कोणत्याही कारणास्तव असे सप्लिमेंट घेणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

विटामिन डी
सुर्याचा प्रकाश हा विटामिन डी चा नैसर्गिक स्रोत मानला जातो. अशातच लोक विटामिन डी ची शरिरातील पुर्तता पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडू शकता. जसे की, मॉर्निंग वॉकला जाणे. परंतु डॉक्टरांनी तुम्हाला व्हिटामिन डी सप्लिमेंट दिली असेल तर त्या तीन महिन्यांपर्यंतच घ्यावा. अन्यथा तुम्हाला श्वास घेणे, पचनाची समस्या, थकवा, चक्कर येणे अशा समस्या उद्भवू शकतात.


हेही वाचा: Health Tips : व्हिटॅमिन-डीयुक्त ‘या’ 5 गोष्टी खा, कॅल्शियमची कमतरता भासणार नाही

- Advertisment -

Manini