Friday, May 17, 2024
घरमानिनीBeautyविंटर केअरसाठी हटके टिप्स

विंटर केअरसाठी हटके टिप्स

Subscribe

थंडीच्या दिवसात हमखास त्वचा कोरडी, निस्तेज किंवा खरखरीत होते. त्यासाठी काही घरगुती उपायांनी सुद्धा तुम्ही यावर मात करू शकता आणि थंडीपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करू शकता.

थंडीसाठी खास टिप्स

Tips for Healthy Winter Skin

- Advertisement -
  • घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन वापरावे.
  • आंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी करावा.
  • हिवाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे.
  • पिकलेल्या पपईचा गर चेहर्‍यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो.
  • संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहर्‍यावर लावल्यास चेहर्‍याचा काळवंडलेपणा कमी होतो.
  • रात्री झोपताना साय किंवा तूप घेऊन त्यात चंदन टाकून मालिश केल्यानेही त्वचेला तेज मिळतं.
  • लिंबाचा रस, गुलाबपाणी आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन रोज सकाळी आंघोळीनंतर हातापायांना लावा दिवसभर त्वचा मऊ राहते.

Why you should use Retinol in your bodycare routine | lookfantastic

  • हिवाळ्यामध्ये तळपायांना, विशेषतः टाचांना भेगा पडणे, भेगांमधून रक्त येणे यासुद्धा समस्या आढळतात. अशावेळी तळपायांना कोकचे तेल लावा.
  • फरशीच्या गारठ्यापासून संरक्षण करण्यासाठी पायात मोजे घालणे उपयोगी ठरते.
  • रात्री बदाम भिजवून , सकाळी त्याची सालं काढून , पेस्ट करून ती संत्र्याच्या रसात मिक्स करून लावावी.
  • खोबरेल तेल ,अ‍ॅरोमा किंवा तिळाच्या तेलानं मसाज करून आंघोळ करणं हा उपाय सर्वोत्तम आहे.

हेही वाचा :

सौंदर्य खुलवण्यासाठी असा करा तूपाचा वापर

- Advertisment -

Manini