घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरLoksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीत विदर्भ- मराठवाडा ठरणार गेम चेंजर?

Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीत विदर्भ- मराठवाडा ठरणार गेम चेंजर?

Subscribe

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यापैकी सर्वाधिक जागा जिंकण्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडी करत आहे. अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी, महायुतीसह महाविकास आघाडीतील पक्ष जागावाटपावर कधी खासगीत तर कधी माध्यमांसमोर येऊन आपला दावा ठोकत आहे. तेव्हा जागावाटापावरून दोन्ही बाजूंकडील मित्रपक्षांत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबई : आगामी लोकसभा 2024 निवडणुकीचे वारे वाहण्यास देशभरात सुरुवात झाली. यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही. सत्ताधारी भाजपला या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीची रणनीती असून, याच आघाडीतील काँग्रेस पक्ष एक ना अनेक क्लृप्त्या लढवत पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच गुरुवारी काँग्रेसच्या 138व्या वर्धापन दिनानिमित्त विदर्भातील नागपुरात है तयार हम सभेचे आयोजन करण्यात आले होते. येथून आगामी लोकसभेचे रणशिंग फुंकले गेले. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत विदर्भ-मराठवाड्यात ज्यांचा वरचष्मा असेल, त्याच पक्षाचा राज्यातील राजकारणात दबदबा राहील, असे सध्या तरी दिसून येत आहे. (Loksabha Election Will Vidarbha Marathwada be a game changer in the upcoming Lok Sabha elections)

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यापैकी सर्वाधिक जागा जिंकण्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडी करत आहे. अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी, महायुतीसह महाविकास आघाडीतील पक्ष जागावाटपावर कधी खासगीत तर कधी माध्यमांसमोर येऊन आपला दावा ठोकत आहे. तेव्हा जागावाटापावरून दोन्ही बाजूंकडील मित्रपक्षांत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. असे असताचा राज्यातील एकूण 48 जागांपैकी 18 जागा या विदर्भ-मराठवाड्यातील आहेत. उर्वरित 30 जागा महाराष्ट्रातील इतर विभागात येतात. परंतु या गठ्ठा 18 जागांवर विजय मिळवणे कोणत्याच युती आणि आघाडीला शक्य नाही; परंतु शह-काटशहचे राजकारण करून या एकूण 18 जागांपैकी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरी पाडून घेण्याच्या तयारीत जो तो दिसत आहे. असे असतानाच नागपुरातून काँग्रेसने है तैयार हमचा नारा देत आगामी लोकसभेचे रणशिंग फुंकल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंदिरा गांधींच्या कार्यकाळातील विदर्भातील सर्वच्या सर्व जागा मिळविण्याची पुनरावृत्ती होते की काय? हे पहावे लागणार आहे. हे पाहण्यासाठी घोडा मैदान अभी दूर नहीं, हे म्हणणे वावगे ठरणार नाही.

- Advertisement -

आताची स्थिती काय?

विदर्भात सद्यस्थितीत 10 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये बहुतांश जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत. यामध्ये अमरावतीमध्ये अपक्ष तर रामटेकमध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे. तर यवतमाळ, बुलढाणा शिवसेना (शिंदे गट) खासदार आहेत. उर्वरित ठिकाणी भाजपचे प्राबल्य दिसून येत आहे. तेव्हा काँग्रेसला पुन्हा त्यांच्या परंपरागत जागा जिंकण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा : Uddhav Thackeray : भीती घालणारं सरकार उलथवलंच पाहिजे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

- Advertisement -

मराठवाड्यातही हेच चित्र?

विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही लोकसभेच्या 8 जागा आहेत. परंतु मराठवाडा विभागात 2019च्या निवडणूक निकालानंतर संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे. या विभागात कुठल्या एका पक्षाला सर्वाधिक जागा जिंकता आल्या नाहीत, हे विशेष. कारण, छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे खासदार आहेत. तर उस्मानाबाद आणि परभणी ठाकरे गटाकडे तर हिंगोली शिवसेना शिंदे गटाकडे, उर्वरित लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यांत भाजपचे प्राबल्य आहे. तेव्हा हे चित्र बदलले तर आगामी लोकसभेत विदर्भ- मराठवाडा गेमचेंजर ठरू शकतो, एवढं मात्र खरं.

हेही वाचा : Supriya Sule : पुढील दहा महिने बारामतीतच तळ ठोकून बसणार; सुळेंनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

सत्तेत महत्त्वाची पदे, पण नशिबात मागासलेपणच

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात, नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन घ्यावे लागते. ते यंदाही पार पडले. नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या खऱ्या, परंतु विदर्भाच्या वाट्याला आले काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. याच विदर्भातून अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एवढंच नव्हे तर, महत्त्वाच्या केंद्रीय मंत्रीपदापर्यंतही मजल मारली आहे. पंरतु जनतेचा अद्यापही बेरोजगारीचा प्रश्न सुटला नाही, हेही तेवढेच महत्वाचे. अशीच काहीशी परिस्थिती मराठवाड्याची सुद्धा आहे. मराठवाड्यातूनही मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपदे भूषवणारे नेते होऊन गेले असतानाही आजही मराठवाडा या ना त्या कारणाने धुमसत आहे. हेच सगळे मुद्दे काँग्रेस पुढे करून आगामी लोकसभेसाठी मैदानात उतरू पाहत आहे. मात्र, याचा कितपत फायदा होतो, हे पहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -