नासलेल्या दुधापासून बनवा ‘हे’ पदार्थ

नासलेल्या दुधापासून बनवा ‘हे’ पदार्थ

अनेकदा दूध नीट तापले गेलं नाही की ते नासते. असे नासलेलं दूध काहीजण फेकून देतात. मात्र हे फेकण्यापेक्षा तुम्ही नासलेल्या दूधापासून अनेक विविध पदार्थ बनवू शकता.

नासलेल्या दूधापासून बनवा बर्फी


दूध नासले असेल तर त्या मध्ये साखर टाकून दूध खूप वेळ आटून घ्यावे. दूधातील पाणी पूर्ण पणे सुकल्यावर ते थंड करावे. त्यानंतर त्याच्या एक सारखे बर्फीचे तुकडे करून घ्यावे.

दही आणि ताक


नासलेल्या दूधापासून तुम्ही ताक किंवा दही बनवू शकता. नासलेल्या दूधात एक चमचा दही मिक्स करून ठेवा, काही तासांनी याचे दही तयार होईल. दह्यापासून तुम्ही ताक देखील बनवू शकता.

पनीर

नासलेले दूध काही वेळ तसेच तापून द्यावे, नंतर ते एका कपड्यात गुंडाळून त्यातील पाणी पिळून घ्यावे. दूधातील सर्व पाणी निघाल्यावर त्याचे पनीर तयार होईल.

स्मूदी


तुम्हाला स्मूदी प्यायला आवडत असेल तर तुम्ही दूधा एवजी नासलेल्या दूधाचा वापर करू शकता. तुम्ही दूध केळी किंवा सफरचंदासोबत मिक्स करू शकता.

रसगुल्ला


नासलेले दूध काही वेळ तसेच तापून द्यावे, नंतर ते एका कपड्यात गुंडाळून त्यातील पाणी पिळून घ्यावे. दूधातील सर्व पाणी निघाल्यावर त्याचे पनीर तयार होईल. त्यामध्ये थोडा मैदा मिक्स करून पीठ मळून घ्यावे आणि पीठाचे बारीक गोळे करा. एकीकडे सारखेचा पाक तयार करून त्यात हे गोळे टाकावे.

 


हेही वाचा :Momos Recipe : घरच्या घरी बनवा चटपटीत व्हेज मोमोज

First Published on: July 4, 2022 4:14 PM
Exit mobile version