पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा दोष असण्याचे प्रमाण वाढतंय

पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा दोष असण्याचे प्रमाण वाढतंय

काही जोडप्यांच्या बाबतीत मूल हवं असून देखील लग्नानंतरच्या वर्षभराच्या प्रयत्नानंतरही संतती सुखापासून ते वंचित राहतात. तेव्हा त्या जोडप्याला वंध्यत्व आहे, असे संबोधले जाते. माझ्यात कोणताही दोष असणे अशक्य आहे, अशी पुरुषी मानसिकता अशावेळी बऱ्याचदा आढळते. ही चौकट मोडून उपचार घ्यायची तयारी दाखवणे आणि ती अंगिकारणे ही वंध्यत्व उपचारासाठीची पहिली व सर्वात महत्त्वाची पायरी आहे. वंध्यत्वाचा दोष स्त्रियांमध्ये असण्याचे प्रमाण ४० टक्के असले तरी पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा दोष असण्याचे प्रमाण वाढत आहे व जवळपास ३०-४० टक्के जोडप्यांच्या बाबतीत पुरुषांमध्ये दोष असतो अशी माहिती एका सर्व्हेक्षणातून पुढे आलेली आहे.

२७.५ मिलियन जोडप्यांना वंध्यत्व

नैसर्गिक पद्धतीने बाळ होऊ न शकणे म्हणजे वंध्यत्व, भारतातील जवळपास १० ते १५ टक्के जोडपी वंध्यत्वामुळे त्रस्त आहेत. मूल व्हावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या जवळपास २७.५ मिलियन जोडप्यांना वंध्यत्वाचा अडथळा सहन करावा लागत आहे. आजच्या काळात वंध्यत्वाच्या समस्येचे प्रमाण वाढत जात असल्याने जास्तीत जास्त जोडपी विश्वसनीय उपचारांच्या शोधात आहेत.

भारतात जवळपास पुरुषांमध्ये ५०% वंध्यत्व 

वंध्यत्वाचा दोष स्त्रियांमध्ये असण्याचे प्रमाण ४०% असले तरी पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा दोष असण्याचे प्रमाण वाढत आहे व जवळपास ३०-४०% जोडप्यांच्या बाबतीत पुरुषांमध्ये दोष असतो. इन्फर्टिलिटी क्लिनिक्स ही फक्त स्त्रियांसाठी असतात हा भारतीय समाजातील सार्वत्रिक गैरसमज आहे. पुरुषांमध्येही वंध्यत्वाचा दोष असू शकतो या महत्त्वाच्या बाबीकडे सहजपणे दुर्लक्ष केले जाते. भारतात जवळपास ५०% वंध्यत्व हे पुरुषांच्या शरीरातील काही दोषांमुळे निर्माण झालेले असते असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.

नवीन तंत्रज्ञानाची जोड आवश्यक

कितीतरी जोडपी उपचारांची सुरुवात खूप उशिरा करतात. ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्या जोडप्यांना अनेक वर्षे प्रयत्न करूनही मूल होत नसेल त्यांनी असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह तंत्रज्ञानाची मदत घेणे गरजेचे असते. उपचार यशस्वी होण्यासाठी ते लवकरात लवकर घेतले जाणे गरजेचे असते.

(डॉ. संतोष मराठे. सीओओ , अपोलो हॉस्पिटल)

First Published on: June 25, 2019 7:43 AM
Exit mobile version