Mask Up India:जाणून घ्या कोरोनाचा प्रसार रोखण्यास मास्क किती टक्के प्रभावित आहे?

Mask Up India:जाणून घ्या कोरोनाचा प्रसार रोखण्यास मास्क किती टक्के प्रभावित आहे?

Mask Up India:जाणून घ्या कोरोनाचा प्रसार रोखण्यास मास्क किती टक्के प्रभावित आहे?

 

कोरोना व्हायरसने संपुर्ण देशात थैमान माजवले आहे. प्रत्येक देशाला कोरोना व्हायसच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.भारतातही कोरोनाचे सावट अद्याप कायम आहे. सरकारने लोकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक नियम,निर्बंधाचे पालन नागरिकांना करण्यास सांगितले आहे. कोरोना पासून बचावाकरीता लस घेण्यासोबतच सोशल डिस्टंसिगचे पालन करणे,हात स्वच्छ धूणे,गरज भासल्यावरच घराबाहेर पडणे, मास्क वापरणे इत्यादी बाबींचा दरोरजच्या जिवनात अवलंब केल्यास कोरोनापासून बचाव होऊ शकतो. नुकतच झालेल्या एका संशोधनामध्ये आढळून आले आहे की, कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्क अत्यंत गरजेचं आहे. संशोधनानूसार सार्वजनिक ठिकणी मास्कचा वापर केल्यास कोरोना संक्रमण होण्याचा दर कमी होऊ शकतो. इतकेच नाही तर कोव्हिड 19 होण्याची शक्यता 25 ट्क्यांनी कमी होते. कोणत्याही समारंभात तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केल्याने कोरोना व्हायरसचा दर 48 ते 57 टक्के कमी झाल्याचे आढळले आहे.

संशोधनकर्त्यांनी हा परिणाम अत्यंत महत्वपुर्ण असल्याचे सांगितले जाते. परंतू तपास करण्यात आलेल्या नमुन्यामध्ये आत्ता हे सांगणे कठीण आहे की मास्क वापरण्याच्या सक्तीने व्हायरसचा प्रभाव लोकांमध्ये राहील किंवा याचा प्रभाव कमी हेईन. आत्ताची स्थिती पाहता मास्क वापरणे शारीरिक सुरक्षिततेसाठी,आरोग्यासाठी महत्वाचे आहे.मास्क वापरल्याने लोकांचे प्राण वाचू शकतात. तसेच पुढील काळात मास्कचा अविरत वापर लोकांना करणे भाग आहे.कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुढील काळात येणारी कोरोनाचा तीसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाची तिसरी लाटही थोपवू शकतो. कोरोनापासून बचावासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे मास्क लावणे.



हे हि वाचा – WHO: Covid-19पासून बचाव करण्यासाठी ‘या’ वयोगटातील लहान मुलांनी मास्क घालणे अनिवार्य



 

First Published on: July 2, 2021 2:13 PM
Exit mobile version