घरगुती किचनमधील वैद्य 

घरगुती किचनमधील वैद्य 

Big onion

कांदा

कानाच्या वेदनेमुळे त्रस्त आहात, तर घाबरण्यासारखे काही नाही. कांद्याचा रस काढून कापसाच्या मदतीने कानात दोन ते तीन थेंब टाका. काही वेळेतच आराम मिळेल.

हळद

शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गरमागरम दुधात हळद मिसळून सेवन करा. याव्यतिरिक्त तेल आणि हळद गरम करून शरीरावर लावल्यानेही लाभ मिळेल.

लसूण

हे अ‍ॅन्टी बॅक्टीरिअल आणि अँटी इंफ्लेमेटरी तत्त्वाने भरपूर असलेले औषध आहे, ज्याने उष्णताही प्राप्त होते. शारीरिक वेदनेत लसूण सर्वोत्तम विकल्प आहे. याव्यतिरिक्त कानात वेदना होत असल्यास लसणाच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने आराम मिळतो.

लवंग

दात दुखीवर लवंग सर्वोत्तम उपाय आहे. भाजलेल्या लवंगीची पेस्ट किंवा लवंगीचे तेल कापसाने दाताला लावल्याने वेदनांपासून मुक्ती मिळेल.

दालचिनी

याने विशेषतः महिलांना मासिक पाळीदरम्यान होणार्‍या त्रासापासून मुक्ती मिळते. अधिक रक्तस्त्राव होत असल्यास दालचिनी लाभकारी ठरेल. केवळ दालचिनी टाकून चहा बनवा किंवा तयार चहामध्ये दालचिनी पावडर टाकून सेवन करा.

किचन टिप्स

*लाल भोपळा पावभाजीत घातल्यास लहान मुलांना पाव-भाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी छान मिळूनही येते.

*घरी कढवलेले तूप जर छान कणीदार व्हायला हवे असेल तर, कढवताना त्यामध्ये एक कण आपले नेहमीचे मीठ टाकायचे आणि नंतर कढवून झाल्या झाल्या त्या भांड्यावर झाकण टाकायचे. गरम असतानाच.

*फोडणीनंतर आमटीवर / मिसळीच्या रश्यावर तर्री / तवंग आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर (चिमूटभर) घातली की आमटीला / रश्य्याला तेलाचा तवंग येतो.

*अर्धबोबडे दाण्याचे कुट करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात खूप दाणे नका घालू. थोडे थोडे दाणे घालून (म्हणजे साधारण मूठभर एकावेळी ) दोन-तीन वेळा ऑन ऑफ करत फिरवले तर अर्धबोबडे दाण्याचे कुट मिळेल.

*भाजलेल्या दाण्याची साले काढू नयेतच. सालासकटच कूट करावे. सालात एक प्रकारचे अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट्स असतात, जे हृदयासाठी चांगले असतात. त्यामुळे सालं खावीत.

*कापल्यावर सफरचंदाला थोडसं मीठ चोळलं तर काळं न पडता तसंच राहातं सफरचंद.

* आप्प्यांच्या पिठात अंडे घातल्यास आप्पे टम्म फुगतात आणि आप्पेपात्राला चिकटतही नाहीत.

* दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायमच मंद आचेवर तापवाव. तापवलं की संपूर्ण झाकायचं नाही, थोडीशी फट ठेवायची. आणि ते दूध खोलीच्या तापमानाला आलं की फ्रिजमध्ये टाकायचं, ४-५ तासात सायीचा थर अजून जाड होतो.

First Published on: November 12, 2018 12:37 AM
Exit mobile version