लग्नात मेहंदी काढण्यामागे ‘हे’ आहे खास कारण

लग्नात मेहंदी काढण्यामागे ‘हे’ आहे खास कारण

लग्न आणि नव्या आयुष्याच्या सुरुवातीसोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांची चिंता प्रत्येकालाच असते. अशातच भारतीय लग्नांमध्ये वर्षानुवर्षे हातांवर मेहंदी काढण्याची परंपरा आणि विधी पार पाडली जाते. मेहंदीची विधी लग्नाच्या एक दिवस आधी केली जाते. मात्र विविध परंपरेनुसार नाचगाण्यासह ही विधी पार पाडली जाते. यादरम्यान नव्या नवरीच्या हातावर काढली जाणारी मेहंदी अत्यंत खास असते. त्यात नवऱ्या मुलाचे नाव लपवले जाते. त्यानंतर नवऱ्याला त्याचे नाव मेहंदीत शोधायला लावले जाते. परंतु यामागे काय नक्की खास कारण आहे हे पाहूयात.

असे मानले जाते की, मेहंदीचा वापर जवळजवळ पाच हजार वर्षांपासून शरीरावर डिझाइन काढण्यासाठी केला जातो. काही विद्वान याला प्राचीन भारताची देणगी असल्याचे मानतात. तर काहीजण याला मुघल आणि इजिप्तच्या काळातील असल्याचे मानतात.

खरंतर मेहंदीला सौभाग्य, आनंद, समृद्धी, प्रेम आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, मेहंदी हे नव-वधूच्या आयुष्यातील नकारत्मकता दूर होते आणि सकारात्मक उर्जा येते. या व्यतिरिक्त मेहंदीला काही ठिकाणी फर्टिलिटीचे प्रतीक मानले जाते.

त्याचसोबत मेहंदी हे दांपत्य आणि त्यांच्या परिवारामधील प्रेम आणि स्नेह दर्शवते. काही मान्यतेनुसार, जर नव वराच्या हातावर मेहंदीचा रंग काळा झाला असेल तर त्याचा अर्थ असा होतो की, नवऱ्यासोबतचे संबंध खुप आनंदी असेल. त्याचसोबत मेहंदीचा रंग नव वधू आणि तिच्या सासू मधील प्रेमाचे नाते दर्शवते. असे मानले जाते की, मेहंदीचा रंग जेवढा काला असेल तो नवविवाहितांसाठी शुभ असेल.


हेही वाचा- ट्रेडिशनल आऊटफिटवर ‘या’ गोल्डन बांगड्या करा वेअर

First Published on: September 15, 2023 2:49 PM
Exit mobile version