Jungle Saffari -जंगल सफारीला जाताना या गोष्टी सोबत हव्याच

Jungle Saffari -जंगल सफारीला जाताना या गोष्टी सोबत हव्याच

जर तुम्हाला निसर्गाची आवड असेल आणि या सुट्टयांमध्ये तुम्हीही जंगल सफारीला जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. कारण जंगलात फिरण्याचा आनंद जरी वेगळा असला तरी तेथे तुम्हाला सगळ्याच सोयी उपलब्ध होतील असे नाही. यामुळे जंगल सफारी ही साधी सफारी नसून साहसी सफारी असते. त्यातच जर तुम्ही देशातील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, काझीरंगा नॅशनल पार्क, सुंदरबन फॉरेस्ट, कान्हा नॅशनल पार्क आणि रणथंबोर नॅशनल पार्क येथे जाण्याचा बेत आखला असेल तर तुमच्याजवळ काही वस्तू असायलाच हव्यात. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या सफारीचा आनंद घेऊ शकता. कोणत्या आहेत या वस्तू ते बघूया.

औषधे

तुम्ही कोणत्याही सहलीला जात असाल, तर काही सामान्य औषधे नेहमी तुमच्यासोबत घ्यावीत. जंगलात सहलीला जातानाही प्राधान्याने औषधे सोबत घ्यावीत. त्यातही कोणत्या आजारावर कोणते औषध घ्यावे हे एका डायरीत लिहून ठेवावे. जंगलातील वातावरण नेहमी थंड असते त्यामुळे सर्दी किंवा फ्लूच्या गोळ्या, ऍलर्जी औषध, पेन किलर, अँटीसेप्टिक क्रीम, मोशन सिकनेस गोळ्या, अतिसारविरोधी औषध सोबत ठेवावीत.

बॅग्ज

जंगल सहलीसाठी जाताना नेहमीच्या बॅग्ज घेऊन जाऊ नये. अशा प्रवासासाठी बाजारात विशेष बॅग मिळतात. त्यांना डेपॅक म्हणतात. तसेच तुम्ही बॅकपॅकही नेऊ शकता. जर तुम्ही ट्रेन, विमान किंवा कारने प्रवास करणार असाल तर व्हील सूटकेस अधिक चांगले. मात्र जंगल सफारीसाठी वेगळ्या बॅग असतात.ज्या तुम्ही डोंगराळ भाग चढतानाही सहज पाठीवर कॅरी करू शकता.

फोटोग्राफी उपकरणे

निसर्गात रिलॅक्स निवांत वेळ घालवण्यासोबतच तुम्ही तुमचे फोटोग्राफी कौशल्यही ट्राय करू शकता. ट्रायपॉड किंवा जड कॅमेरे ठेवू शकणाऱ्या बीन बॅग सोबत ठेवा. प्रवासासाठी मोबाईल कॅमेराही तुम्ही वापरू शकता.

पोर्टेबल चार्जर

तुमच्या सोबत पोर्टेबल चार्जर ठेवा. जेणेकरुन तुमचा मोबाईलच नाही तर तुमच्या जवळील इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूही नेहमी चार्ज होत राहतील. अनेकदा जंगलात वीज आणि चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसते. अशावेळी पोर्टेबल चार्जर उपयोगी पडते.

स्किन केयर

जंगल सफारीचा आनंद घेत असताना, आपल्या त्वचेचे सूर्य, उष्णता आणि डासांपासून संरक्षण करा. तुमच्या बॅगेत सनस्क्रीन, मास्क, कॅप, हँड सॅनिटायझर आणि डासांपासून संरक्षण देणाऱ्या कॉईल घेऊन जायला विसरू नका.


 

First Published on: April 25, 2024 7:58 PM
Exit mobile version