बॉयफ्रेंडसोबत कधीच शेअर करू नका ‘या’ गोष्टी

बॉयफ्रेंडसोबत कधीच शेअर करू नका ‘या’ गोष्टी

कोणत्याही नात्याचा पाया प्रेम आणि विश्वासावर टिकून असतो. परंतु नात्यात जेव्हा तुम्ही एकमेकांना पुरेसा वेळ देता तेव्हा कुठे तुम्हाला पार्टनरच्या काही गोष्टी कळू लागतात. अशातच काहीजण पार्टनरवर डोळेझाकून विश्वासही ठेवतात. परंतु प्रेमात आंधळे होऊन कोणत्या गोष्टी शेअर करू नये याच बद्दल अधिक जाणून घेऊयात.

एक्सबद्दल बोलू नका


भूतकाळात जर एखाद्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही असाल आणि वर्तमानकाळात एका नव्या रिलेशनशिपमध्ये असाल तर पार्टनरला आपल्या एक्सबद्दलच्या सर्वाकाही गोष्टी शेअर करू नये. वारंवार पार्टनरसमोर एक्स पार्टनरच्या काही गोष्टी सांगत बसल्याने तुमच्यात वाद वाढू शकतो.

पर्सनल माहिती शेअर करू नका


एक-दोन भेटीतच पार्टनरला आपल्याबद्दलच्या सर्वकाही गोष्टी सांगणे टाळा. जर तुम्हाला पार्टनरसोबत ट्रांसपेरेंट रिलेशनशिप हवे असेल तर एकमेकांसाठी थोडा वेळ काढा. जर तुम्हाला पार्टनरसोबत रिलेशनशिप दीर्घकाळ टिकवायचे असेल तर पर्सनल माहिती वेळोवेळी शेअर करण्यापासून दूर रहावे. पार्टनरला कधीच आपले सोशल मीडिया अकाउंट, फोनचा पासवर्ड अथवा बँक डिटेल्स शेअर करू नका.

मायनस पॉइंट सांगू नका


प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही मायनस पॉइंट असतात. काही मुली विचार न करता आपल्या पार्टनरला आपल्या सर्वकाही गोष्टी शेअर करतात. असे केल्यानंतर त्यांना कालांतराने पश्चाताप होतो. कारण काही मुलं याचा गैरफायदा घेत तुम्हाला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे अशी चूक करण्यापासून दूर रहा.


हेही वाचा- ‘ही’ आहेत रिलेशनशिप डिप्रेशनची लक्षणं

First Published on: October 30, 2023 6:25 PM
Exit mobile version