Sunday, April 28, 2024
घरमानिनीRelationship'ही' आहेत रिलेशनशिप डिप्रेशनची लक्षणं

‘ही’ आहेत रिलेशनशिप डिप्रेशनची लक्षणं

Subscribe

प्रेम आणि विश्वास कोणत्याही नात्याचा पाया असतो. मात्र एखाद्या कारणास्तव विश्वास मोडला जातो तेव्हा नात्यात तणाव वाढू लागतो. अशातच नात्यातील गैरसमज वेळीच दूर केले नाहीत तर ते रिलेशनशिप डिप्रेशनचे कारण ठरू शकतात. याची लक्षण सामान्य असतात. ती ओळखायची असतील तर पार्टनरच्या मासिक बदलावाला तुम्ही पुढील काही गोष्टींनी ओळखू शकता.

रिलेशनशिप डिप्रेशनचे लक्षण ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे मूड डिसऑर्डर. यावेळी व्यक्ती सतत नकारात्मक विचार आणि भावनांमध्ये अडकलेला असतो. जेव्हा व्यक्ती डिप्रेशनमध्ये असतो तेव्हा त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात फार बदल झालेला दिसून येतो.

- Advertisement -

How Does Depression Affect Relationships? - Denova Collaborative Health

या व्यतिरिक्त व्यक्ती गिल्टमध्ये राहतो आणि त्याला स्वत:बद्दलचा आत्मविश्वास कमी झालायं असे वाटत राहते. प्रत्येक गोष्टीवर तो वैतागतो आणि सतत थकलेला असतो. त्याला निर्णय घेताना सुद्धा समस्या येतात. त्याचसोबत त्याला आवडत असलेल्या गोष्टी करण्याचे मनही होत नाही. त्याच्यामध्ये आत्महत्येचे विचार येत राहतात.

- Advertisement -

रिलेशनशिप डिप्रेशनचे आणखी एक लक्षण म्हणजे पार्टनरकडून प्रेम न मिळणे, काळजी न करणे, पार्टनरपासून दूर जाणे अशा काही गोष्टी असू शकतात. रिलेशनशिपमध्ये असताना सुद्धा एकटेपणा वाटू शकतो. यामुळे स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. तसेच नात्यात संवाद नसणे हे सुद्धा याचे एक कारण असू शकते.

जर तुमच्या पार्टनरमध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसून येत असतील तर तुम्ही याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. खरंतर प्रयत्न केला पाहिजे की, अशा काळात तुम्ही पार्टनरच्या जवळ राहिले पाहिजे. पार्टनरसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. त्याच्या सोबत बाहेर फिरायला गेलात तर त्याचे मनही हलके होईल आणि त्याला तुम्ही त्याच्यासोबत आहात असे ही वाटेल.


हेही वाचा- थकवा आणि चिडचिड, पेरेंटल बर्नआउटचे संकेत

- Advertisment -

Manini