तुमचा ऑनलाईन डेटींग पार्टनर तुम्हाला फसवतोय का? हे आहेत संकेत

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे ऑनलाईन डेटिंगचा ट्रेंन्ड फार वाढला आहे. परंतु ऑनलाईन डेटिंगचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे सुद्धा आहेत.

तुमचा ऑनलाईन डेटींग पार्टनर तुम्हाला फसवतोय का? हे आहेत संकेत

Online partner cheat on  you

आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधीतरी एखाद्यावर प्रेम जडते. प्रत्येक जण कधीही एखाद्याशी भावनात्मक रुपात जोडला जाऊ शकतो. अशातच सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे ऑनलाईन डेटिंगचा ट्रेंन्ड फार वाढला आहे. परंतु ऑनलाईन डेटिंगचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे सुद्धा आहेत. कारण ऑनलाईन डेटिंगवेळी तुम्ही पार्टनरला लगेच भेटत नाहीत. त्यामुळे आपला पार्टनर नक्की काय करतोय हे कळत नाही. (Online partner cheat on  you)

काही वेळेस असे होते की, ऑनलाईन डेटिंगव टाइमपास म्हणून ही एखाद्याशी नाते जोडले जाते. पण त्याचवेळी तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीशी भावनात्मक रुपात जोडले जातात. सुरुवातीला सर्वकाही छान वाटतं पण ऑनलाईन डेटिंगवरील पार्टनरच्या काही गोष्टींमुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. अशातच तुमचा ऑनलाईन डेटिंगवरील पार्टनर तु्म्हाला फसवत तर नाहीयं ना हे ओळखण्यासाठी नक्की काय करावे हे पाहूयात.

Online partner cheat on  you

-ऑनलाईन डेटिंगवरील पार्टनरवर खुप प्रेम जडले असेल आणि तुम्ही त्याला भेटण्यासाठी बोलावता. पण तो वेळोवेळी तुम्हाला भेटण्यासाठी नकार देत असेल तर समजून जा तो तुम्हाला फसवत आहे.
-काही वेळेस पार्टनर तुम्हाला अशी काही कारणं देईल ज्याला काही अर्थच नाही. पण तरीही तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. असे करण्यापासून तु्म्ही दूर राहिलेलेच बरे.
-पार्टनर तुम्हाला अचानक सांगतो तो तुमच्याशी बोलू शकत नाही आणि काही दिवसानंतर तो तुम्हाला फोन करत असेल तर समजून जा पार्टनर तुमच्यासोबत सीरियस नाही.
-तुम्ही पार्टनरला त्याच्या घराच्या पत्त्याबद्दल विचारलात तर तो तुम्हाला वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणांची नावं सांगून तुम्हाला भ्रमित करु शकतो. (Online partner cheat on  you)
-पार्टनर तुम्हाला सांगत नसेल तो काय करत आहे, त्याच्या आवडी-निवडी तर समजून जा तुमचे नाते फार काळ टिकणारे नाही.
-लहान लहान गोष्टींवरुन तो तुमच्याशी सतत वाद घालत असेल तर अशा नात्यात तुमची वॅल्यू कमी होईलच. पण तो तुमच्याशी ब्रेकअप करण्याचे मार्ग यामधून शोधू शकतो.


हेही वाचा- Relationship: ‘या’ संकेतांवरून कळेल तुम्ही Toxic रिलेशनशिपमध्ये आहात

 

First Published on: May 30, 2023 5:29 PM
Exit mobile version