बालपणीच मुलांना शिकवा ‘हे’ शब्द, आयुष्यभर राहतील तुमचे ऋणी

बालपणीच मुलांना शिकवा ‘हे’ शब्द, आयुष्यभर राहतील तुमचे ऋणी

पालक असणे म्हणजे तुम्हीच मुलांचे पहिले शिक्षिक असता. जेव्हा मुलांना भावी आयुष्यात खंबीरपणे उभे करायचे असेल त्यावेळी पालकांचा यामध्ये फार मोठा वाटा असतो. पालकांनी त्याला अशा काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत ज्याची त्याला खरंच गरज असते. म्हणजेच याचा अर्थ असा होता नाही की, केवळ मुलांचे शिक्षण किंवा गुणांवर लक्ष दिले पाहिजे. उलट मुलांना अन्य सवयी सुद्धा लावल्या पाहिजेत. मुलांमध्ये दयाळूपणा, एखाद्याशी प्रेमाने बोलणे असे काही गुण त्याच्या अंगीकारले पाहिजेत. मुलांना बेसिक मॅनर्स प्रत्येक पालकाचे कर्तव्यच आहे. अशातच कोणते बेसिक मॅनर्स मुलाला शिकवले पाहिजेत याच बद्दल आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. (Parenting tips)

-प्लीज आणि थँक्यू बोलणे
विनम्रता आणि बेसिक मॅनर्सची सुरुवातच प्लीज आणि थँक्यू बोलण्यापासून होते. मुलाला काहीही शिकवण्यापू्र्वी त्याला हे दोन शब्द जरुर शिकवा. जेव्हा तुमचे मुलं एखादी गोष्ट मागतो किंवा एखाद्याकडून घेतो तेव्हा त्याला थँक्यु आणि प्लीज बोलण्यास शिकवा.

-स्वत: स्वच्छता करणे
ही सवय मुलांना आयुष्यभर कामी येईल. स्वच्छ राहणे आणि काही गोष्टी स्वत:हून स्वच्छ करण्यास शिकवणे याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही केवळ स्वच्छ राहता. पण यामुळे तो स्वावलंबी सुद्धा होते. ही सवय लावणे सुरुवातीला थोडं मुश्किल होऊ शकते. पण हळूहळू ही सवय त्याला जरुर लावा.

-एक्सक्युज मी
चालताना एखाद्याला बाजूला होण्यास सांगायचे असेल तर त्याला एक्सक्युज मी म्हटले जाते. यावरुन कळते की, तु्म्ही किती आत्म जागरुक आहात. तसेच आसपासच्या लोकांच्या पर्सनल स्पेसचा तुम्ही सन्मान करता. हिच सवय तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा लावा.(Parenting tips)

-रोल मॉडल व्हा
केवळ काही गोष्टी सांगितल्याने ते शिकत नाहीत. जेव्हा तुम्ही त्यांना काही गोष्टी करण्यास सांगता तेव्हा त्यांना ते कश्या प्रकारे कराव्यात हे सुद्धा दाखवावे. आई-वडिलांकडून मुलं लवकर शिकतात. त्यामुळे पालकांनी सुद्धा चांगल्या सवयी स्वत:ला लावल्या पाहिजेत.


हेही वाचा- ‘या’ 5 चुकांमुळे बिघडू शकतं वडिलांबरोबरचं नातं

First Published on: June 4, 2023 5:05 PM
Exit mobile version