Saturday, April 27, 2024
घरमानिनीRelationship'या' 5 चुकांमुळे बिघडू शकतं वडिलांबरोबरचं नातं

‘या’ 5 चुकांमुळे बिघडू शकतं वडिलांबरोबरचं नातं

Subscribe

आयुष्यात वडिल होणे ही आनंदाची भावना असतेच. पण जेव्हा मुलांची जबाबदारी येते तेव्हा बेजबाबदार व्यक्ती सुद्धा जबाबदाऱ्या समजून घेतो. आपल्या मुलाला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू नये म्हणून तो सतत झटत असतो. वडिल कधीच आपल्या मनातील भावना स्पष्ट करत नाही याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही त्याच्या गैरफायदा घ्याल. वडिलांसोबतचे नाते तुम्हाला टिकवून ठेवायचे असेल तर काही चुका करणे तुम्ही टाळले पाहिजे. काही वेळेस वडिल आणि मुलांमध्ये मतभेद असू शकतात. पण मतभेद असले तरीही त्यांना उलट बोलणे चुकीचे आहे.(Relationship with father tips)

-गप्प बसा तुम्हाला काहीच माहिती नाही
काही मुलं अशी असतात जी मोठी झाल्यानंतर आपल्या वडिलांना गप्प करतात. मज्जा-मस्करी जरी त्यांच्यासोबत करत असाल तेव्हा त्यांचे मनं दुखावले जाईल असे काहीही बोलू नका.

- Advertisement -

-जेव्हा एखादे काम त्यांना येत नाही तेव्हा
मुलं आणि पालकांमधील जनरेशनच्या गॅपमध्ये काही गोष्टी बदलेल्या असतात. ज्या वडिलांनी तुम्हाला हात धरुन चालण्यास शिकवले होते त्याच वडिलांना वयाच्या उतरत्या काळात आपली गरज भासते. तेव्हा मुलांनी तुम्हाला हे काम येत नाही ते काम येत नाही अशी तक्रार कधीच करु नका. विसरु नका ते तुमचे वडिल आहेत. त्यांना मदत करणे हेच तुमचे काम आहे.

- Advertisement -

-तुम्ही नातवंडांना बिघडवलेय
निवृत्तीनंतर प्रत्येक व्यक्ती आपल्या उतार वयात नातवंडांसोबत अधिक वेळ घालू इच्छितात. अशातच जेव्हा ते नातेवडांवर प्रेमापोटी काही गोष्टी करत असतील तर त्यांच्या प्रेमाला चुकीचे ठरवू नका. तुम्ही नातवंडांना बिघडवत आहात असे कधीच म्हणू नका. यामुळे त्यांना फार वाईट वाटू शकते.

-तुम्ही आमच्यासाठी काय केले
जेव्हा तुमच्या आयुष्यात काही गोष्टी सुरळीत होत नसतील तेव्हा वडिलांना तुम्ही जे काही केलेयं त्याचमुळे आमच्या आयुष्यात असं होतयं असे कधीच म्हणू नका. परंतु मुलांना कळत नाही की, त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी किती कष्ट केलेले असतात. पण मुलांनी कधीच आपल्या वडिलांना त्यांच्या आयुष्यातील चुका दाखवून देऊ नये.(Relationship with father tips)

-हे सर्व तरुणांनाच सूट होते
काही वेळेस मुलं ही आपल्या वडिलांना ज्या गोष्टी आवडतात त्या स्विकार करत नाही. जसे ते काय परिधान करतात. काही वेळेस जजमेंटल होऊन असे ही म्हणतात की, हे सर्वकाही तरुणांना सूट होते. असे बोलताना त्यांना किती दु:ख होऊ शकते याचा विचार मुलांनी केला पाहिजे.


हेही वाचा- ‘या’ 5 चुकांमुळे बिघडू शकतं वडिलांबरोबरचं नातं

- Advertisment -

Manini