मुरुमे नाहीसे करण्याचे सोपे उपाय

मुरुमे नाहीसे करण्याचे सोपे उपाय

प्रातिनिधिक चित्र

बर्फ थेरपी
चेहर्‍यावर मुरुमे आल्यास त्यावर बर्फ लावणे उत्तम. यामुळे मुरुमांचा लालसरपणा कमी होतो. तसेच सूजही कमी होते. बर्फ लावल्याने मुरुमे कमी होण्यास मदत होते. कपड्यामध्ये बर्फ घेऊन तो मुरुमांच्या जागी काही वेळ ठेवा. ही प्रक्रिया दिवसभरात २-३ वेळा करा.

टूथपेस्ट
मुरुमे आल्यावर त्यावर पांढरी टूथपेस्ट लावा. यामुळे मुरुमांची सूज कमी होण्यास मदत होते. मात्र हे ध्यानात ठेवा जेल टूथपेस्ट नको.

स्टीम उपचार
चेहर्‍यावर चमक हवी असल्यास स्टीम गरजेचे आहे. यामुळे केवळ चेहर्‍यावरील घाण दूर होत नाही तर त्वचा मुलायम होण्यास मदत होते. स्टीममुळे रोमछिद्रे खुली होतात. यामुळे त्वचा श्वास घेऊ शकते.

लसूण
लसणामध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल तसेच अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे गुणधर्म असल्याने मुरुमांवर लसूण गुणकारी ठरते. यातील सल्फर त्वचेसाठी लाभदायक असतात. लसूण सोलून त्याची पेस्ट करुन मुरुमांवर लावा. पाच ते सात मिनिटे लावून चेहरा कोमट पाण्याने धुवा.

अंड्यातील सफेद भाग
अंड्यातील सफेद भागात प्रोटीन असते. अंड्यातील सफेद भागामुळे चेहर्‍यावरील मुरुमांचे डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी अंड्यांचा सफेद भाग थोडा फेटून मुरुमांवर लावा. जेव्हा सुकेल तेव्हा चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.

टोमॅटो
टोमॅटो तेलकट त्वचेसाठी उपयुक्त असतात. टोमॅटोमुळे ब्लॅकहेड्स तसेच चेहर्‍यावरील काळेपणा दूर करण्यास उपयोग होतो. ताज्या टोमॅटोचा रस काढून चेहर्‍यावर लावा. त्यानंतर एका तासाने चेहरा धुवा.

केळ्याची साल
केळे खाणे शरीरासाठी जितके फायदेशीर तितकेच केळ्याची साल देखील उपयोगी असते. मुरुमे झाल्यास केळ्याच्या सालीच्या आतील भाग चेहर्‍यावरुन फिरवा. ५ मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका.

First Published on: September 4, 2018 2:00 AM
Exit mobile version