काळी पडलेली प्लास्टिकची खुर्ची अशी करा स्वच्छ

काळी पडलेली प्लास्टिकची खुर्ची अशी करा स्वच्छ

बसण्यासाठी प्लास्टिक खुर्चीचा बहुतांशवेळा वापर केला जातो. त्याचसोबत सर्वात उत्तम गोष्ट अशी की,ती वजनाने हलकी असल्याने सहज एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येते. सतत खुर्चीचा वापर केल्याने ती काळी पडू लागते. अशातच ती स्वच्छ कशी करायची असा प्रश्न सर्वांना पडतो. याच बद्दलच्या पुढील काही टीप्स फॉलो करू शकता.

डिटर्जेंट आणि विनेगर


खुर्चीवर लागलेले डाग हटवण्यासाठी तुम्ही स्क्रबरने घासण्याची चुक काढू नका. कारण असे केल्याने डाग निघणार नाही. अशातच ती स्वच्छ करण्यासाठी डिटर्जेंट आणि विनेगरचा वापर करू शकता. याचा वापर करताना टुथब्रश किंवा सॉफ्ट स्पंजचा वापर करू शकता.

बेकिंग सोड्याचा वापर


बेकिंग सोड्याचा वापर केल्याने तुमची काळी पडलेली खुर्ची स्वच्छ होऊ शकते. यासाठी एका बाउलमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात 1-2 चमचे बेकिंग सोडा, लिंबूचा रस मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करू शकता. आता ते स्पंज किंवा टूथब्रशच्या मदतीने खुर्चीवरील डाग स्वच्छ करू शकता.

शॅम्पूचा वापर


शॅम्पूचा वापर करून तुम्ही खुर्ची चमकवू शकता. कारण शॅम्पूचा वापर करताना एका गोष्टीची काळजी घ्यावी की, तो एक्सपायर झालेला असावा.


हेही वाचा- कुकरचा रबर सैल झाला असेल तर वापरा ‘या’ टिप्स

First Published on: September 15, 2023 7:17 PM
Exit mobile version