Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen कुकरचा रबर सैल झाला असेल तर वापरा 'या' टिप्स

कुकरचा रबर सैल झाला असेल तर वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

प्रेशर कुकर हे स्वयंपाकघरातील एक शस्त्र आहे. ज्याशिवाय स्वयंपाका पूर्ण होणे फार कठीण आहे. भारतीय कुटुंबात प्रेशर कुक्कर दररोज वापरला जातो. प्रेशर कुकरमध्ये डाळ-भात बनवण्यापासून भाजी शिजवण्यापर्यंत आणि केक बनवण्यापर्यंत बरेच काही बनवता येते. परंतु जर चुकूनही प्रेशर कुकरचा रबर सैल झाला असेल तर त्याला तुम्ही अशाप्रकारे घट्ट करू शकता. प्रेशर कुकरचे रबर बदलणे सोपे आहे. पण जर का अचानकच प्रेशर कुकरचा रबर खराब झाला तर काय करावे लागेल. याविषयी आपल्या काही टिप्स माहित असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया या टिप्स बद्दल.

सर्वप्रथम जाणून घ्या कुकरचे रबर सैल का होतो?

  • प्रेशर कुकरचे रबर सैल होण्याचे एक कारण म्हणजे ते जुने झाले असतील.
  • किंवा रोजच्या वापरामुळे त्याची लवचिकता कमी झाली असेल.
  • याव्यतिरिक्त, रबर योग्य प्रकारे धुतला नसल्यास हे देखील होऊ शकते.
  • प्रत्येक वापरानंतर, तुम्ही प्रेशर कुकरचा रबर काढून त्याला चांगले धुवावे.
  • तुम्ही जर का डिश वॉशर वापरत असाल तर त्यात प्रेशर कुकरचा रबर टाकू नका.
  • प्रेशर कुकरचे रबर नेहमी साबण आणि पाण्याने धुवा, परंतु तारेच्या स्क्रबर वापरू नका.
  • त्यामुळे रबर सोलून जाते आणि त्यामुळे हळूहळू काम करणे बंद होण्याची शक्यता असते.
  • धुतल्यानंतर, प्रेशर कुकरचे रबर पूर्णपणे कोरडे होऊ द्या, कुकरच्या झाकणात ठेवू नका.

प्रेशर कुकरचे रबर सैल झाले तर काय करावे?

Safety & Cleaning Tips For Your Pressure Cooker | Get Set Clean

1. कुकरचे रबर थंड करा
- Advertisement -

सारखा सारखा कुकर वापरून खूप गरम होतो त्यामुळे त्याचा रबर सुद्धा खराब होतो. अशावेळी रबरला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे लागेल जेणेकरून रबर थोडा थंड होईल. तसेच हा रबर तुम्ही खूप थंड पाण्यातही ठेवू शकता. हा रबर थंड पाण्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवलात आणि मग हा रबर कुकरला लावलात तर सहजपणे कुकरला फिट होईल.

2. प्रेशर कुकरच्या झाकणावर टेप लावा

जर का तुमच्या कुकरचा रबर सैल झाला असेल आणि तुम्हाला पटकन कुकर लावायचा असेल तर अशावेळी कुकरच्या झाकणाला सेलोटेप तुम्ही यावेळी लावू शकता. जेणेकरून कुकर घट्ट बसेल आणि कुकर मधले अन्न देखील नीट शिजेल.

3. पिठाच्या मदतीने प्रेशर कुकर दुरुस्त करा
- Advertisement -

जर तुम्हाला इतर कोणताही मार्ग समजत नसेल तर मळलेल्या पीठाच्या मदतीने तुम्ही प्रेशर कुकरचे झाकण घट्ट करू शकता. तसेच झाकणाला रबर लावण्यासाठी तुम्ही मळलेले पीठ सुद्धा झाकणाला आतल्या बाजूला लावू शकता. यामुळे झाकण व्यवस्थित बसेल आणि मग कुकरमध्ये दाब व्यवस्थित तयार होईल.

_______________________________________________________________________

हेही वाचा : नॉन-स्टिक पॅनमध्ये जेवण का शिजवू नये?

 

 

- Advertisment -

Manini