kitchen Tips : दूध उतू जातंय का ? मग वापरा ‘या’ घरगुती टिप्स

kitchen Tips : दूध उतू जातंय का ? मग वापरा ‘या’ घरगुती टिप्स
घरातल्या जेवणाचं नेहमी काय बनवायचं हे टेन्शन तर असतंच,अशातच दूध तापवताना त्या कडे सारखं लक्ष देणं हा टास्क खूप मोठा असतोच. पण काही काही वेळा असे होते कि,लक्ष दिलं तरी दूध हे उतू जात आणि यामुळे सगळं किचन खराब होत. यावेळी काय करू असा विचार मनात येतो आणि याला पर्याय काय करायचं या शोधात आपण असतो.
दूध उतू जात असेल तर करा ‘हे’ उपाय-
  • दूध उतू जाऊ नये म्हणून दुधाच्या भांड्याच्या कडेला थोडं बटर किंवा तेल लावावं.
  • बटर लावणार असेल तर ते जास्त लावू नये.
  • ते लावलं की मग भांड्यात दूध घालून ते मंद आचेवर तापण्यास ठेवावं.
  • या उपायानं दूध जास्त उकळत नाही किंवा जळतही नाही.
  • बाजारात दूध उतू जाण्यास रोखणारे स्पिल स्टॉपर्स मिळतात. याचाही उपयोग करु शकता.
  • लाकडी काठी दुधाच्या भांड्यावर नीट ठेवली की दूध उतू जात नाही.
  • ही तबकडी सिलिकॉनपासून तयार झालेली असल्यानं ती विरघळत नाही आणि दूध फाटण्याची वगैरेही चिंता नसते.
  • महत्वाचं म्हणजे मंद आचेवर दूध तापायला ठेवलं तरी दूध हे उतू जातंच.
  • यासाठी आणखी एक सोपा उपाय म्हणजे दुधाच्या फेसावर थोडं पाणी शिंपडावं.
  • त्यामुळे वर आलेलं दूध लगेच खाली जातं. यामुळे दूध उतू जाण्याचा धोका कमी असतो.
दूध तापवताना महत्वाच्या टिप्स जर फॉलो केल्या तर अशाप्रकारची हानी होणार नाही. तसेच दूध वाया जाणार नाही आणि जास्त साफसफाई करण्याचे कष्ट पडणार नाहीत.  दुधाचं भांडं गॅसवर ठेवलं की ते तापेपर्यंत ओट्याजवळच उभं राहाणं शक्य नसतं. अशातच आपण लगेच येतो ते बघायला पण त्याआधीच दूध हे वाया गेलेलं असत.

 


हेही वाचा :

Beuty Tips : शिळ्या पोळी पासून बनवा अगदी सोप्या पद्धतीत फेस पॅक

First Published on: April 17, 2023 5:27 PM
Exit mobile version