रात्रीचे शिळे अन्न आपण सहसा खात नाही, तर फेकून देतो किंवा एखाद्या प्राण्याला घालतो. शिळे अन्न खाल्ल्याने शारीरिक समस्या होऊ शकतात. अनेकवेळा पोट दुखू शकते. असे आपल्या खूप आधीपासून सांगण्यात आलेले असते. परंतु शिळ्या अन्नाचा आपण अनेक पद्धतीने वापर करू शकतो. शिळ्या चपात्या खरं तर हानिकारक नसतात तर त्या शरीराला पोषक असतात. रात्रीच्या ७ते ८ तासांमधल्या चपात्या ह्या जर सकाळी खाल्या तर त्यामधून अनेक पोषण घटक आपल्याला शरीराला मिळत असतात.

याव्यतिरिक्त चपातीचे अनेक फायदे आहेत. गव्हा मध्ये अनेक गोष्टी असतात ज्याची गरज शरीराला मोठ्याप्रमाणात असते. आपल्या सर्वांच्याच घरात गव्हाच्या पीठाची चपाती बनवली जाते. ही चपाती ताजीच खावी. कारण ताजे भोजन हे शरीरासाठी लाभदायकच असते यात काही शंकाच नाही. पण गव्हाच्या चपातीची एक विशेष गोष्ट आहे. गव्हाची चपाती तयार करून झाल्यावर 8 ते 12 तासांनंतर ती अधिक गुणकारी होते. हेच कारण आहे की पूर्वीपासून लोक सकाळी खाण्याकरता रात्रीच चपाती बनवून ठेवायचे. गावाकडे आजही ही पद्धत मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
आता आपण जाणून घेऊया शिळ्या चपातीचा फेस पॅक कसा तयार करतात ?
- सर्वात आधी शिळी चपातीचा चुरा बनवून मिक्सर मध्ये वाटून घ्या.
- आता यात एक चमचा शुगर पावडर घाला.
- अर्धा चमचा मध घाला. त्यानंतर गुलाबजल घालून या सर्व पदार्थांपासून एक मस्त पेस्ट बनवून घ्या.
- ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर फेस पॅक सारखी लावा आणि २५ मिनिटांनी ताज्या पाण्याने चेहरा धुवून घ्या.

आता आपण जाणून घेऊया शिळ्या चपातीचा फेस स्क्रब कसा तयार करतात ?
- सर्वात आधी शिळ्या चपातीचा चुरा बनवून घ्या. एकदम बारीक पावडर करून घ्या.
- आता यात एक चमचा शुगर पावडर आणि अर्धा चमचा कॉफी टाका.
- या सोबत 1 चमचा नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑईल मिक्स करा.
- यानंतर हि पेस्ट चेहऱ्याला लावताना हळूवारपणे मसाज करत चेहरा छान स्क्रब करून घ्या.

अगदी थोडक्यात झाला तुमचा फेस स्क्रब तयार. तसेच सुपरफास्ट ग्लो मिळवण्यासाठी या स्क्रबचा वापर हा कधीही करू शकता. हा स्क्रब 4 मिनिटे आपल्या स्कीन वर स्क्रब करा आणि स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून साफ करून घ्या. यामुळे चेहरा उजळून निघेल आणि यासोबतच एक छानसा ग्लो तुम्हाला पाहायला मिळेल.