Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeRajma Pulao : झटपट बनवा राजमा पुलाव

Rajma Pulao : झटपट बनवा राजमा पुलाव

Subscribe

सतत डाळा भात, मसाले भात खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळे खावेसे वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला राजमा पुलाव कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

साहित्य : 

  • 2 वाटी तांदूळ
  • 1 वाटी राजमा
  • 1 कांदा
  • 2 टोमॅटो
  • 1/2 चमचा जिरे
  • 1 चमचा धणे पूड
  • 4 लसूण पाकळ्या
  • आल्याचा तुकडा लहान
  • 1/2 चमचा हळद
  • 1/2 चमचा तिखट
  • 1/2 चमचा गरम मसाला
  • 2 तमालपत्र
  • तेल
  • मीठ चवीनुसार

कृती :

Rajma Pulao Recipe: राजमा पुलाव कसा तयार करायचा?

- Advertisement -
  • सर्वप्रथम 4 तास राजमा भिजत घाला आणि नंतर प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्या. तोपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.
  • आता गॅसवर पुलाव करण्यासाठी कुकर ठेवा.
  • कुकर गरम झाल्यावर त्यात तेल घालून जिरं ,तमालपत्र, आलं-लसूण परतून घ्या, नंतर कांदा परता.
  • कांदा भाजला की त्यात चिरलेला टोमॅटो परतून घ्या. नंतर मीठ आणि शिजलेला राजमा, गरम मसाला घालून परता.
  • आता त्यात तांदूळ घाला आणि हा पुलाव एकदा नीट परता.
  • पुलाव परतून झाल्यावर त्यात गरम पाणी ओतून कुकरचे झाकण लावा.
  • कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा.
  • कुकर गार झाला की तयार राजमा पुलाव सर्व्ह करा.

 


हेही वाचा :

Veg Omelette : Yummy रवा ऑम्लेट

- Advertisment -

Manini