बाळ का रडतं? ‘ही’ आहेत त्यामागची कारणे

आपलं बाळ सतत रडतं असते म्हणून बहुतांश महिला चिंतेत असतात. कारण लहान बाळांना बोलता येत नसल्याने ते रडण्यातूनच आपल्याला काय होतेयं याचे संकेत देत असतात.

बाळ का रडतं? ‘ही’ आहेत त्यामागची कारणे

Reasons behind baby crying

आपलं बाळ सतत रडतं असते म्हणून बहुतांश महिला चिंतेत असतात. कारण लहान बाळांना बोलता येत नसल्याने ते रडण्यातूनच आपल्याला काय होतेयं याचे संकेत देत असतात. अशातच त्यांच्या रडण्याचा नेमका अर्थ काय काढावा हे सुद्धा काही वेळेस कळत नाही. कधी कधी तर ते संध्याकाळी अचानक रडू लागते किंवा मध्यरात्री सुद्धा. अशा स्थितीत महिलेला वाटते की, बाळाचे लंगोट खराब झाले असेल त्यामुळे ते रडतेय. पण प्रत्येक वेळी लंगोड किंवा डायपर खराब झालेय म्हणूनच ते रडतात असे नाही. त्यांना सुद्धा प्रौढ व्यक्तींसारखे दुखण्याची समस्या उद्भवू शकते. (Reasons behind baby crying)

तुमचं बाळ सतत रडत असेल तर त्यामागे काहीतरी कारणं असू शकतात हे आधी जाणून घेतले पाहिजे.
बाळ का रडतं यामागील काय कारण असू शकतात हे पाहूयात.

Reasons behind baby crying

-जर तुमचे मुलं दररोज एका खास वेळीच जसे की, संध्याकाळीच रडण्यास सुरुवात करत असेल तर अशी शक्यता असू शकते की, त्याला कोलिक डिजीज असेल. या समस्येवेळी मुलाच्या पोटात फार दुखते आणि म्हणून ते रडू लागते. काही खातपित सुद्धा नाही. हा आजाराचा त्रास बाळांना 3 महिन्यांपर्यंत सुद्धा होऊ शकतो. परंतु 3 महिन्यानंतर तो आजार आपोआप बरा होतो.

-बाळ रडण्यामागील दुसरं कारणं असे की, त्यांना घातले जाणारे कपडे. जर तुम्ही बाळांना अधिक घट्ट कपडे घालत असाल तर समस्या होऊ शकते. त्यांना शरिराला ते टोचू शकतात. बाळांना उन्हाळ्याच्या दिवसात सुती आणि कॉटनचे कपडे घाला. तर थंडीच्या दिवसात त्यांना लोकरीचे कपडे घाला. पण त्यांचे कपडे अधिक घट्ट असू नयेत याकडे लक्ष ठेवा.

-जर बाळ आईचे दूध पीत असेल तर आईने चुकीच्या खाद्यपदार्थांच्या सवयीमुळे त्याचा त्रास बाळावर होऊ शकतो. जर आईच्या पोटात गॅस तयार होणारे पदार्थ किंवा अधिक मसालेदार पदार्थांचे सेवन केलेले असेल तर बाळाला याचा त्रास होऊ शकतो. आईसह बाळाला पोटात दुखणे, गॅसची समस्या होऊ शकते.

-बाळाला कधी कधी खुप खाऊ घालण्यापासून ही दूर रहावे. त्यांना गरजेनुसारच दूध द्यावे किंवा पदार्थ भरवावत. अन्यथा त्यांची तब्येत बिघडू शकते. त्यांच्या पोटात अधिक अन्न गेल्यास पोट फुगू शकते. यामुळेच त्यांना बैचेनी वाटत राहते आणि ते रडत राहतात. (Reasons behind baby crying)

-काही वेळेस बाळाचा हात आपण लगेच खेचतो. असे करणे खरंतर चुकीचे आहे. यामुळे त्याच्या मानेला झटका बसून तेथील हाडाला नुकसान पोहचू शकतेच. पण ते रडू लागतात. त्यांना तुम्ही आपल्याजवळ घेताना फार काळजी घेतली पाहिजे.


हेही वाचा- तुमचं मुल स्वभावाने बुजरे आहे का? मग त्याला असे बनवा confident

First Published on: May 30, 2023 12:03 PM
Exit mobile version