Thursday, May 9, 2024
घरमानिनीRecipeRecipe : टेस्टी तंदूरी आलू टिक्की

Recipe : टेस्टी तंदूरी आलू टिक्की

Subscribe

संध्याकाळी भूक लागली की काहीतरी चटपटीत खावसं वाटतं. अशावेळी तुम्ही तंदूरी आलू टिक्की नक्की ट्राय करा.

साहित्य :

  • 7-8 लहान बटाटे
  • गरम मसाला पावडर
  • धने पावडर
  • 1/2 चमचा लिंबाचा रस
  • मीठ चवीनुसार
  • पाणी काढलेलं दही
  • लाल मिरची पावडर
  • कसूरी मेथी
  • व्हेजिटेबल ऑइल

 कृती : 

Tandoori Aloo Tikka Recipe - Indian Spiced Roasted Smoked Potatoes by  Archana's Kitchen

- Advertisement -
  • सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करा आणि त्यामध्ये मीठ एकत्र करून बटाट उकडून घ्या.
  • बटाटे उकडल्यानंतर त्यांची साल काढून तुकडे करा. आता बटाट्याचे तुकडे एका भांड्यामध्ये घ्या आणि त्यामध्ये दही एकत्र करा.
  • आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि कसूरी मेथी एकत्र करा. काही वेळासाठी हे मिश्रण तसचं ठेवा.
  • आता एक नॉन स्टिक पॅन घ्या आणि त्यामध्ये थोडं तेल गरम करा.
  • जेव्हा तेल गरम होइल तेव्हा त्यामध्ये बटाटे टाकून फ्राय करून घ्या.
  • फ्राय केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि वरून लिंबाचा रस टाकून व्यवस्थित एकत्र करा.
  • तयार तंदूरी आलू टिक्की सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : संत्र्याच्या सालीची टेस्टी भाजी

- Advertisment -

Manini