Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी रवा कचोरी

Recipe : टेस्टी रवा कचोरी

Subscribe

अनेकांना विविध पदार्थ खाण्याची खूप आवड असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रवा कचोरी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1 कप रवा
  • 1/4 चमचा हिंग
  • 1 कप पाणी
  • मीठ चवीनुसार
  • तेल (कचोरी तळण्यासाठी)
  • 1/2 कप उकडलेले बटाटे
  • 1/4 चमचा लाल तिखट
  • 1/4 चमचा धने पावडर
  • 1/4 चमचा सुक्या कैरीची पावडर
  • 1/4 चमचा जिरे

कृती :

Suji Kachori

- Advertisement -
  • सर्वप्रथम कढईत तेल गरम करून हिंग घाला आणि
  • आता त्यात रवा हलका गुलाबी होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या.
  • यानंतर 1 कप गरम पाण्यात चवीनुसार मीठ आणि रवा हळूहळू घाला आणि हे मिश्रण मऊ होईपर्यंत मळून घ्या.
  • आता कचोरीचे सारण तयार करण्यासाठी पॅनमध्ये तेल टाका आणि गरम केल्यानंतर जिरे, धनेपूड, कैरी पावडर आणि लाल तिखट घाला.
  • आता सारणात चवीनुसार मीठ टाका आणि त्या स्टफिंगमध्ये उकडलेले बटाटे मॅश करा आणि चांगले मिसळा आणि 3-4 मिनिटे तळून घ्या.
  • यानंतर पिठाचे छोटे गोळे बनवा आणि पीठ पसरून त्यात मधोमध सारण भरा.
  • सारण भरल्यानंतर ते सर्व बाजूंनी बंद करून कचोरीचा गोल आकार द्या.
  • अशा प्रकारे सर्व कचोर्‍या एकत्र तयार करुन घ्या.
  • आता कढईत तेल गरम करून त्यात रवा कचोरी सोनेरी होईपर्यंत तळा.
  • आता तुमची गरमागरम रवा कचोरी प्लेटमध्ये चटणीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : नाचणीचे कटलेट

- Advertisment -

Manini