रिलेशनशिममधील ‘या’ गोष्टी ठरतील एंग्जायटीसाठी कारणीभूत

रिलेशनशिममधील ‘या’ गोष्टी ठरतील एंग्जायटीसाठी कारणीभूत

रिलेशनशिमध्ये जर तुम्हाला एंग्जायटीचा अनुभव येत असेल तर यामागे काही कारणे असू शकतात. जर तुमच्यासोबत असे काही घडले असेल त्यामध्ये पार्टनरने तुम्हाला फसवले असेल, डंप केले असेल अथवा गैरसमज झाले असती तर ही सुद्धा एंग्जायटीची कारणं असू शकतात. त्यामुळे अशा स्थितीपासून दूर राहण्यासाठी नात्यात स्पष्टता असणे अत्यावश्यक आहे.

काही वेळेस नात्यात आत्मविश्वास नसेल तर एंग्जायटीचा अनुभव येतो. त्यावेळी सतत असे वाटते की, पार्टनर आपल्या बरोबरीचा नाही आणि स्वत: च तुम्ही अधिक विचार करू लागता. अशातच तुम्ही सेल्फ डाउटचे शिकार होता.

जर तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल खात्रीशीर नसाल आणि पार्टनर तुमच्या या स्थितीबद्दल सीरियस नसेल तर हे सुद्धा एंग्जायटीचे कारण ठरू शकते. अशा चुकीपासून दूर राहण्यासाठी पर्याय म्हणजे आपली आर्थिक स्थिती, कर्ज , करियर याबद्दलचे काही प्लॅन डिस्कस करा.

या व्यतिरिक्त पार्टनरशी मोकळेपणाने बोलता येत नसेल तर तुमच्यामध्ये एंग्जायटी येऊ शकते. एकमेकांपासून दूर होऊ अशी भीती वाटत राहते. त्याचसोबत तुमच्यामध्ये बैचेनी आणि चिंता सुद्धा वाटते. मात्र तुम्ही पार्टनरशी याबद्दल बोलून एंग्जायटी दूर करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एंग्जायटी पासून दूर राहण्यासाठी पार्टनरशी संवाद असणे फार महत्त्वाचे आहे.


हेही वाचा- ब्लाइंड डेटवर जात असाल तर ‘या’ सेफ्टी टीप्स ठेवा लक्षात

First Published on: September 14, 2023 6:18 PM
Exit mobile version