दीपिका रणवीर घेत आहेत जुन्या पिढीकडून relationship चे धडे

दीपिका रणवीर घेत आहेत जुन्या पिढीकडून relationship चे धडे

बॉलिवूड मधील बेस्ट कपल्स म्हणून पहिले दीपिका आणि रणवीरचेच नाव येते. या दोघांनी 2018 मध्ये इटलीत लग्न केले. आज इंडस्ट्रीमधील ते हॅपनिंग कपल्सपैकी एक आहेत. बहुतांश जण त्यांच्या प्रेमाचे उदाहरण ही एकमेकांना देत असतात. नुकत्याच एका टाइम्स मॅगजीनला दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने असे म्हटले होते की, रणबीर सोबतचे नाते अधिक घट्ट टिकून रहावे म्हणून काही ना काही करत असते. ऐवढेच नव्हे तर नव्या जनरेशची लोक सुद्धा या कपल्सला फॉलो करण्याचा सल्ला देतात.

अशातच तुम्हाला सुद्धा आपल्या पार्टनरसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये रहायचे असेल तर दीपिका पादुकोणने सांगितलेल्या काही टीप्स तुम्ही नक्की फॉलो करु शकता.

आपल्या नात्याची दुसऱ्यांसोबत तुलना करु नका

आपल्या नात्याची कधीच दुसऱ्यांसोबत तुलना करु नका. प्रत्येकजण नाते कोणत्या पद्धतीने निभावत आहे याची परिभाषा वेगळी असते. एखाद्याच्या नात्यात फारच समजूतदारपणा असेल तर दुसऱ्याच्या नात्यात तितकेसे समजून घेणे होत नसेल. यामुळे तुम्ही तुमचे नाते दुसऱ्यांसोबत तुलना करणे चुकीचे आहे.

पार्टनरला सपोर्ट करा


अरेंज मॅरेज असेल किंवा लव्ह मॅरेज तेव्हा एकमेकांच्या सहमतीनेच लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे. काही वेळेस एकमेकांचे आचार-विचार वेगळे असू शकतात. पण यामुळे मतभेद करणे चुकीचे आहे. या उलट जर तुम्ही पार्टनरची गोष्ट समजून घेऊन त्याला सपोर्ट केला पाहिजे. त्यांचा तुमच्याबद्दलचा दृष्टीकोन काय हे सुद्धा समजून घ्या.

नात्याला सांभाळण्यास जुन्या पिढीकडून शिका


आपल्या आजूबाजूची नाती आपल्या मानसिकतेवर ही परिणाम करतात. यामध्ये सर्वात मोठी भुमिका आई-वडिलांची असते. आपण लहानपणापासूनच पाहतो की, आपले आई-वडिल त्यांचे नाते कशा प्रकारे सांभाळतात, कसे एकमेकांना समजून घेतात. अशातच तुम्ही जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेता तेव्हा सुद्धा आई-वडिल नात्याबद्दलच्या चार गोष्टी समजावून सांगतात. अशातच जुन्या पिढीकडून तुम्ही नाते कसे टिकवायचे हे तुम्ही शिकले पाहिजे.


हेही वाचा- सासू-सुनेचे नाते बिघडवू शकतात ‘या’ गोष्टी

First Published on: May 25, 2023 12:44 PM
Exit mobile version