Saturday, April 27, 2024
घरमानिनीRelationshipसासू-सुनेचे नाते बिघडवू शकतात 'या' गोष्टी

सासू-सुनेचे नाते बिघडवू शकतात ‘या’ गोष्टी

Subscribe

सासू-सुनेचे नाते अत्यंत खास असते जसे एखाद्या आई-मुलीचे. एखादी सासू सुनेला वारंवार टोकते किंवा सासू सुनेला टोकण्यासह तिला काही गोष्टी समजावून ही सांगते.पण काही वेळेस असे होते की, तुमच्या नात्याला एखाद्याची नजर लागते आणि त्यामुळे तुमच्यात वाद निर्माण होऊ लागतात. जर तुम्हाला सुद्धा याची भीती वाटत असेल तर वेळीच काही गोष्टींची काळजी घ्या.

-समजून न घेता उत्तर देऊ नका
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काही माहिती नसेल तर त्यावर आपल्या सासूला किंवा सुनेने उत्तर देऊ नये. यामुळे वाद निर्माण होऊ शकतात. अशातच ती गोष्ट जाणून घ्या आणि नंतरच शांतपणे तुम्ही त्याबद्दल बोला. असे केल्याने तुमच्या नात्यात मधुरता कायम टिकून राहिल.

- Advertisement -

-दुसऱ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा
प्रत्येकाच्या घरी नात्याला वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. अशातच दुसरे तुमच्या नात्याबद्दल काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा. जर तुम्ही दुसऱ्यांना अधिक महत्व देऊ लागलात तर सासू-सुनेच्या नात्यात फूट पडू शकते.

-घराबाहेरच्या व्यक्तींसोबत एकमेकांच्या चुका काढू नका
नात्यात वाद होतात. पण हेच वाद घरातल्या घरात राहिले तर बरे होतील. अशातच शेजारी किंवा पाहुण्यांच्या समोर सासू-सुनेने कधीच आपले वाद आणू नयेत. एकमेकांचा दुसऱ्यांच्या समोर खालीपणा करणे फार चुकीचे आहे. अशाने सासू-सुनेच्या नात्यात कधीच गोडवा राहणार नाही. दोघेही एकमेकांचा राग करत राहतील.

- Advertisement -

हेही वाचा- चतुर सासूबाईना कसं हॅण्डल कराल?

- Advertisment -

Manini