‘या’ कपल्सची सेक्स लाईफ असते हेल्दी!

‘या’ कपल्सची सेक्स लाईफ असते हेल्दी!

लैंगिक जीवन सुधारण्यासाठी  बहुतेक लोक त्यांच्या आहारात बरेच बदल करतात. काही लोक यासाठी डॉक्टरांचाही सल्ला घेतात. पण एका नव्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की मासांहरी लोकांपेक्षा शाकाहरी लोकांचे लौंगिक आयुष्य जास्त सुखकारक असते. हे सर्वेक्षण यूकेच्या एका वेबयाईटने केलं आहे.

५०० शाकाहारी आणि ५०० ​​मांसाहारी लोकांवर हे विशेष सर्वेक्षण केलं गेलं. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ५७ टक्के शाकाहारी लोक आठवड्यातून किमान ३ ते ४  वेळा सेक्सचा आनंद घेतात, तर ४९  टक्के मांसाहारी लोकं आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लैंगिक संबंध ठेवतात. इतकेच नव्हे तर सर्वेक्षणानुसार शाकाहारी लोक मांसाहारांपेक्षा जास्त ‘डर्टी टॉक’ एन्जॉय करतात.

सर्वेक्षणात ८४ टक्के शाकाहारी लोक त्यांच्या लैंगिक जीवनावर समाधानी आहेत तर केवळ ५९ टक्के मांसाहारी त्यांच्या जोडीदारावर आनंदी आहेत. या सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की शाकाहारी लोक मेथीची भाजी, बडीशेप जास्त खातात. यामुळे त्यांच्यात लैंगिक इच्छा मोठ्या प्रमाणावर निर्माण होते.

त्याच बरोबर वेबसाइटच्या या सर्वेक्षणातील निकालांमधून एक गोष्ट समोर येते की आपण मांसाहारी असाल तर आपल्या आहारात अधिक वनस्पतीजन्य पदार्थांचा समावेश करा.

First Published on: August 28, 2020 9:06 PM
Exit mobile version