सुंदर आरोग्यासाठी गुलाबपाण्याचे फायदे…

सुंदर आरोग्यासाठी गुलाबपाण्याचे फायदे…

सुंदर आरोग्यासाठी गुलाबपाण्याचे फायदे...

गुलाबाचे फूल आणि गुलाबी रंग हे युगानुयुगे तरल प्रेमभावसांशी निगडीत आहे. तसेच ते सौंदर्याचे प्रतीकही मानले जाते. मात्र, गुलाबपाणी एवढ्या पुर्ती मर्यादीत नसुन आरोग्यासाठी देखील गुलाबपाण्याचा वापर केला जातो. आपल्या त्वचेचे सौंदर्य खूलवण्यासाठी विविध ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. पण दररोज अशा महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणे हे सांगण्यांनाच परवडेलच असे नाही. म्हणून गुलाब पाण्याचा वापर आपण आपले सौंदर्य वाढवण्यासाठी करू शकतो. गुलाबपाणी सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच त्याचे वापर शारीरिक समस्या दूर करण्याचे फायदे देखील मोठ्या प्रमाणात आहेत.

गुलाबपाणी आरोग्यासाठी गुणकारी

१. सुंदर चेहर्‍याच्या निगेसाठी गुलाबपाणी अतिशय चांगले ‘क्लीनझिंग एजंट’ म्हणून ते उपयुक्‍त ठरते. त्याचा उपयोग आपल्या त्वचेवरील घाण, मळ दूर करणयास मदत होते.

२. गुलाबपाणी हे थंड आहे. त्यामुळे खाज सुटल्यास आणि भाजल्यास त्यावर गुलाब पाणी लावल्यामुळे त्याची आग कमी होते.

३. चेहऱ्यावरील, त्वचेवरील डाग घालवण्यासाठी गुलाब पाणी अतिशय लाभदायक आहे. दररोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी गुलाबपाणी आपल्या चेहऱ्याला लावा त्यामुळे डाग कमी होण्यास मदत होईल.

४. गुलाबपाण्यातील नैसर्गिक शीतलेमुळे डोळ्यांच्या अनेक विकारांसाठी उपयुक्त ठरते. डोळे येणे, डोळे कोरडे होणे, डोळ्यांच्या बुब्बुळावर कडेला पांढरा पापुद्रा येणे अशा आजारांसाठी गुलाबपाणी फायदेशीर ठरते.

५. डोकेदुखी, अर्धशिशीचा त्रास होत असल्यास गुलाबपाण्याचा वाफारा घेतल्याल त्या समस्या दूर होताना. तसेच एक कपडा घेऊन त्यावर गुलाबपाणी शिंपडून तो कपडा काही वेळ डोक्याला बांधून ठेवले तर रागात तापलेले डोके शांत होते.

६. लिंबू आणि गुलाबपाणी एकत्र करून जी पेस्ट तयार होते. ती पेस्ट चेहऱ्यावर लावले असता चेहऱ्यावरील मुरमे कमी होण्यास मदत होईल. हे मिश्रण १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून नंतर पाण्याने धुवावे. लिंब हे आम्लीय आहे, तर गुलाबपाणी हे गारवा देणाचे गुण आहेत. त्यामुळे त्वचेला कोणतेही समस्या उद्भवत नाही.

७. मुलतानी मातीचा वापर गुलाबपाण्यासोबत केल्यास त्वता उजळ करण्यासाठी मदत होते. तसेच त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

First Published on: March 16, 2019 4:23 PM
Exit mobile version