मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी SBI बँक देते ‘खास’ सवलत

मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी SBI बँक देते ‘खास’ सवलत

केंद्र सरकारने मुलींसाठी (Girls) सुकन्या समृद्ध योजना (Sukanya Samriddhi Yojana) सुरू केली आहे. या योजने अंतर्गत मुलींना शिक्षणासाठी आणि लग्नासाठी संपूर्ण 15 लाख रुपयेSBI बँककडून मिळणार आहेत. या योजनेमुळे आई-वडिलांना मुलीच्या भविष्यात आर्थिक मदत मिळेल, मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने सरकारने ही योजना आणली आहे.

या योजनेत तुम्ही 250 रुपयापासून ते 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतात. SBI बँकेने सुकन्या समृद्ध योजनेअंतर्गत मुलीना 15 लाख रुपये देणार आहे. यासंदर्भात बँकेने ट्विट करत ही माहिती दिली. या योजनेतून तुम्हाला हमी उत्पन्नाचा लाभ मिळतो. यामुळे तुम्हाला कर सवलतीमध्ये देखील लाभ मिळू शकतो. ही योजना खास करून मुलींसाठी आहे.

या योजनेत सरकार 8 टक्के दराने व्याजाचा लाभ देत असून तुम्ही ही योजना दोन मुलींसाठी घेऊ शकतात. तसेच पहिली मुलगी झाली आणि यानंतर दोन जुळ्यामुली असतील तरी या योजनेचा लाभ त्या मुलींना मिळेल. SBI बँकेत 15 वर्षासाठी खाते उघडू शकता. तुम्ही जर या योजनेचे हफ्ते वेळेवर जमा केले नाही तर, तुम्हाला 50 रुपये दंड भरावा लागेल.

 

First Published on: June 7, 2023 5:22 PM
Exit mobile version