Sex एन्जॉय करायचं पण त्यावर बोलायचं मात्र नाही

Sex एन्जॉय करायचं पण त्यावर बोलायचं मात्र नाही

आजही समाजात सेक्सवर बोलणे टॅबू मानले जाते. काहीजण याबद्दल चारचौघात बोलूच शकत नाही. त्यावेळी तोंड बंद करायला लावले जाते. पण आजची सध्याची बदलती पिढी यावर मात्र खुलेपणाने बोलते. पण तरीही समाजात सेक्स हा विषय बहुतांश वेळा टाळलाच जातो. दोन जीवांमध्ये होणाऱ्या शारिरीक संबंध म्हणजे सेक्स. ते करताना एन्जॉय करायच पण त्यावर मात्र अजिबात बोलायचे नाही असे बहुतांश जण करतात. सेक्शुअल हेल्थ बद्दल न बोलल्यास त्या बद्दलच्या काही गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे समाजात सेक्स बद्दलच्या कोणत्या विषयावर बोलणे चुकीचे मानले जाते हे पाहूयात.

-सेक्स करणे भारतीय संस्कृतिच्या विरोधात


सेक्स तज्ञ असे म्हणतात की, सेक्स भारतीय संस्कृतिच्या विरोधात आहे. तर भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. येथे सेक्स हा शब्द तोंडातून काढूच दिला जात नाही. याला टॅबू मानले जाते. घरात सुद्धा यावर बोलताना आधी आजूबाजूला पाहिले जाते.

-कंडोमचा वापर


सेक्शुअल हेल्थसाठी कंडोम हे अगदी सुरक्षित मानले जाते. पण याला सुद्धा टॅबू मानले जाते. 10 टक्क्यांपेक्षा कमी भारतीय कंडोमचा वापर करतात. खरंतर भारतात कायदेशीर रुपात कोणत्याही वयात कंडोम वापरण्याची परवानगी आहे. यासाठी आई-वडिल किंवा डॉक्टरांच्या प्रेस्क्रिप्शनची गरज पडत नाही. तरीही लोक ते खरेदी करण्यासाठी घाबरतात.

-सेक्स एज्युकेशन

 
काही शाळा, महाविद्यालये आज ही सेक्स एज्युकेशनच्या विरोधात आहेत. मुंबईत करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार 90 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना वाटते की सेक्स एज्युकेशन व्हावे असे वाटते. भारतात लैंगिक शिक्षणाप्रति पालक आणि समाजात नकारात्मक भावना असते. हेच कारण असते की, शाळेतील मुलांना सेक्स आणि पीरियड्स हाइजीन बद्दल कळत नाही.

-लग्नापूर्वी सेक्स म्हणजे पाप


लग्नापूर्वी सेक्स करणे पाप मानले जाते. आज सुद्धा बहुतांश ठिकाणी महिलांची वर्जिनिटी चाचणी केली जाते. शारिरिक गरजांपैकी एक असेलल्या सेक्सला आज ही लग्नापूर्वी करणे वाईट मानले जाते. दुसऱ्या बाजूला लग्नानंतर महिलांवर दबाव टाकला जातो. जेणेकरुन त्यांनी लवकरात लवकर बाळं जन्माला घालावे.

-लग्नाआधी गर्भपात


लग्नापूर्वी सेक्स किंवा गर्भपात करण्यास भारतीय समाजात मान्यता नाही. लग्नापूर्वी तुम्हाला असा आव आणावा लागतो की, तुम्हाला सेक्स बद्दल काहीच माहिती नाही. या व्यतिरिक्त गर्भपात करण्यासाठी सुद्धा नकार दिला जातो.


हेही वाचा- Oral Sex ओरल सेक्समुळे कॅन्सर होतो का?

First Published on: May 22, 2023 12:09 PM
Exit mobile version